Gulabrao Patil Vs Sanjay Raut
Gulabrao Patil Vs Sanjay RautSarkarnama

Gulabrao Patil : 'आपला पगार किती अन् आपण बोलतो किती?' ; गुलाबरावांनी राऊतांना डिवचले!

Gulabrao Patil Vs Sanjay Raut :लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती, ज्यावरुन गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

Loksabha Election 2024 : शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे आक्रमक नेते म्हणून परिचित आहेत. संधी मिळताच ते विरोधकांवर जोरदार टीका करतात. आता त्यांनी खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्याला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी उत्तर दिले आहे.

Gulabrao Patil Vs Sanjay Raut
Sanjay Raut : फडणवीसांचे स्क्रिप्टेड नाटक, योगींच्या राजीनाम्यासाठी वरिष्ठांच्या फडणवीसांना सूचना

मंत्री पाटील म्हणाले, 'संजय राऊत(Sanjay Raut) हे निवडणुकीपासून पळ का काढतात?. त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करायला हवी होती. त्या ऐवजी ते राज्यसभेवर जातात. त्यांना आयतं लग्न करून घ्यायची सवय झाली आहे. आता एवढ्याच धंदा त्यांना उरला आहे.'

Gulabrao Patil Vs Sanjay Raut
NDA Government : नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेल्या पक्षांना किती जागा? पाहा संपूर्ण यादी...

गुलाबराव पाटील यांनी म्हटले, 'राऊत यांची उंची किती किती आहे?. आपली औकात किती? आपला पगार किती? आपण बोलतो किती? आणि मुख्य म्हणजे कोणाविषयी बोलतो, याचा राऊत यांनी जरा विचार करावा. ते त्यांच्यासाठी बरे होईल.'

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनाही टोला लगावला. ते म्हणाले, 'प्रत्येकाला वाटते की केंद्रात आपले सरकार यावे. मात्र असे विधान करताना सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ लागते. याचा त्यांना विसर पडलेला दिसतो.'

'सरकार यावे यासाठी डोकी मोजली जातात. सध्या सर्वात जास्त संख्याबळ एनडीएकडे आहे. त्यामुळे केंद्रात पंतप्रधान मोदी यांचे सरकार येत आहे. त्यात काहीही बदल होण्याची शक्यता नाही.' असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com