Sanjay Raut : फडणवीसांचे स्क्रिप्टेड नाटक, योगींच्या राजीनाम्यासाठी वरिष्ठांच्या फडणवीसांना सूचना

Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे सगळे स्क्रिप्टेड असून उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घेण्यासाठी वरिष्ठांच्या फडणवीसांना सूचना असल्याची राऊत यांनी टीका केली आहे.
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची वाताहत झाली आहे. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी सरकारमधून मोकळे करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरिष्ठांकडे केली आहे. या सगळ्या घडामोडींवर भाष्य करता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे सगळे स्क्रिप्टेड असून उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा घेण्यासाठी वरिष्ठांच्या फडणवीसांना सूचना असल्याची राऊत यांनी टीका  केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार टक्कर देणाऱ्या भाजपलाच धक्के बसल्याचे निकालाच्या आकडेवारीने दाखवून दिले. या निकालात ठाकरे-पवार आणि काँग्रेस 30 जागा खेचल्याने भाजप आणि मित्रपक्षांच्या नेतृत्वाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

विशेषतः महाराष्ट्रात कागदावर प्रचंड ताकद असूनही भाजपला जेमतेम 9 जागा मिळाल्याने प्रदेश संघटनेत बदल होण्याचे संकेत दिले गेले. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आता सरकारमधून म्हणजे, उपमुख्यमंत्रीपदावरून मोकळे करण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाकडे मांडली. 

गंभीर म्हणजे, जो काही पराभव झाला आहे. त्याची जबाबदारी माझी आहे. ती स्वीकारतो, अशी कबुलीही फडणवीसांनी दिली. मला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती पक्ष नेतृत्त्वाला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावर संजय राऊत यांनी प्रतिकिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले , देवेंद्र फडणवीसांनी पराभव मान्य करणे आवश्यक आहे. विदर्भात भाजप पूर्णपणे साफ झाला आहे. एक नागपूर आणि अकोल्यात तिरंगी लढतीमध्ये जिकंलेले सोडले तर चंद्रपूर पासून वर्धा गडचिरोली अशा सर्व जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. फडणवीस हे विदर्भाचे अनडिस्प्युटेड  नेते आहेत असे बोले जात होत. महाराष्ट्रात त्यांच्या शिवाय पन देखील हलणार नाही असं सांगितले जात होते. मात्र महाराष्ट्राने त्यांचे झाडाचं उखडून टाकले आहे. 

जबाबदारी मधून मुक्त व्ह्याच आहे. हे देवेंद्र फडणवीसांचे स्क्रिप्टेड नाटक आहे. ते जास्त काळ चालणार नाही. हे घटना भैयय सरकार असून जनतेने फडणवीसांना रिटायर्ड केले असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com