Gulabrao Patil : मंत्रीपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण सोडणार नाही : शिंदे गट नेत्याचा राज्यपालांना इशारा!

Gulabrao Patil : कोणत्याही पक्षाचा असो त्यांना माफ केलं जाणार नाही.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलल्या वादग्रस्त विधानावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यभरात राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला, असे असले तरी शिंदे गटाचे नेते व भाजप नेते राज्यपालांची बाजू सावरण्यासाठी पु्ढे सरसावलेले दिसून आले. मात्र आता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यपालांवर बरसून टीका केली आहे.

Gulabrao Patil
Sarkarnama Open Mic Season 2 : शिंदे गटाच्या दिपाली सय्यद यांची कबुली

मंत्रीपद खड्ड्यात गेलं तरी चालेल पण, राज्यपालांना सोडणार नाही. राज्यपालांवर त्यांनी चांगलीच आगपाखड केलेली आहे. पाटील म्हणाले, शिवरायांच्याबाबतीत कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही . ज्यांना छत्रपतींबाबत माहिती आहे, त्यांनीच बोलावं. शिवरायांच्या बाबतीत कोणीही वाकडं तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असो त्यांना माफ केलं जाणार नाही.

शिवाजी महाराज हे देवाचे देव आहेत. ज्यांनी शिवचरित्र वाचलंय त्यांनी बोलावं. राज्यपाल असो की राष्ट्रपती असो, छत्रपती हे छत्रपती आहेत. तेच मोठे आहेत, अशा कडक शब्दात त्यांनी राज्यपालांना सुनावले आहेत. .

Gulabrao Patil
Samruddhi Mahamarg : फडणवीसांनी दाखवून दिलं, राज्याच्या 'समृद्धी'चे 'स्टेअरिंग' आपल्याच हाती..

एकीकडे भाजप आणि शिंदे गटातील नेते राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर सावधपणे भूमिका घेत असताना, गुलाबराव पाटील मात्र भलतेच आक्रमक झाले आहेत. यामुळे शिंदे गटातील, काही थोडके नेतेच आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसतात. मात्र इतर नेते यांनी राज्यपालांवर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com