Gulabrao Patil Politics: गुलाबराव पाटील म्हणतात, तो तर लाडक्या बहिणींचाच करंट...

Gulabrao Patil; Minister Patil says Dear sisters given political current to our opposition-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, मला शिवसैनिकांच्या अडचणी कळतात.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधकांना चिमटा घेतला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी विरोधकांवर चांगलेच शरसंधान केले. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही चांगलेच बळ मिळाले.

पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ६१ कॉमन मॅनचा सत्कार केला. यावेळी मंत्री पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांनी आपले अनेक अडचणी सांगितल्या. मतदारांच्या वाढत्या अपेक्षा काय आहेत, यावरही चर्चा केली. त्यामुळे मंत्री पाटील आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा हा संवाद चांगलाच रंगला.

Gulabrao Patil
Devyani Pharande Politics: आमदार देवयानी फरांदे यांची धाड अन् पोलिसांची नाचक्की! पोलिसांना दिसले नाही ते फरांदेंनी शोधले

यावेळी मंत्री पाटील यांनी महायुतीच्या विरोधकांना चांगलाच झटका दिला. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींनी आमच्या विरोधकांना ४४० व्होल्टचा झटका दिला. त्यातून ते अद्यापही सावरलेले नाहीत. या झटक्यामुळेच आम्ही विरोधकांचा दारुण पराभव करू शकलो.

Gulabrao Patil
Manikrao Kokate Breaking: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेप्रकरणी मोठी अपडेट, निकाल लांबला, आता 'या' तारखेला सुनावणी

आमच्यावर अद्यापही विरोधकांकडून गद्दारी आणि अशाच शिलक या शब्दात आरोप होतात. कारण विरोधकांकडे कोणताच ठोस मुद्दा राहिलेला नाही. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने धडाकेबाज काम करून जनतेला सांगण्यासाठी विरोधकांना मुद्दाच ठेवलेला नाही.

आम्ही आजही हिंदुत्वावर ठाम आहोत. आम्ही कोणतीही बंडाळी केलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवलेली आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि त्यांची राजकीय विचारसरणी पुढे नेण्यासाठीच आम्ही काम करीत आहोत.

मी देखील एक साामन्य शिवसेना कार्यकर्ताच आहे. तळागाळात काम करूनच पुढे आलो आहे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय त्रास होतो. याची मला जाणीव आहे. त्यामुळे तळागाळातील शिवसेना कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत.

मंत्री पाटीलल यांनी तुमच्या प्रत्येक अडचणीत मी पाठीशी उभा राहील, असा शब्द कार्यकर्त्यांना दिला. विशेषतः चाळीसगावच्या शिवसेना कार्यकर्त्यांबरोबर मी नेहमीच राहील. त्यांना जे जे गरजेचे असेल ती सर्व विकासाची कामे होतील.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शिवसेनेचे नेते पप्पू गुंजाळ, प्रवक्ते प्रदीप देसले, डॉ. सुनील राजपूत, रामचंद्र जाधव, भाऊसाहेब पाटील यांसह शिवसेनेच्या विविध कार्यकर्त्यांनी चाळीसगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्काराच्या कार्यक्रमाबाबत मंत्री पाटील यांनी या सर्व आयोजकांचे भर सभेतच कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com