गुलाबराव पाटील एक फोन येताच घाबरून पळाले!

जळगाव येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मेळावा झाला.
Shivsena leader Sanjay Sawant
Shivsena leader Sanjay SawantSarkarnama

जळगाव : शिवसेनेशी (Shivsena) गद्दारी केलेल्यांनी गुवाहाटीतून येऊन आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, हा शिवसैनिक तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केला आहे. (Shivsena workers stand firm with Uddhav Tahkre in Jalgaon)

Shivsena leader Sanjay Sawant
बंडूकाका बच्छाव बंडखोर दादा भुसेंचे राजकारण विस्कटणार?

शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात जळगाव जिल्ह्यातील चार शिवसेना आमदार व एक अपक्ष आमदार यांचा सहभाग आहे. या ‍पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची केमिस्ट भवन येथे बैठक झाली.

Shivsena leader Sanjay Sawant
‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर’

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भगाळे, हर्षल माने, शिवसेना गटनेते नितीन लढ्ढा, महानगरप्रमुख शरद तायडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांच्याच शेरो शायरीच्या स्टाईलने टिका करताना ते म्हणाले, की पाटील आपल्या भाषणात शेरोशायरी करून आपण शिवसेनेशी किती प्रामाणिक आहोत हे सांगत होते. मात्र आता वेळ आली तर ते शिवसेना सोडून निघून गेले. नेहमी मर्दाची भाषा करणारे केवळ एक फोन आला तर घाबरून पळाले.

भाजपचा त्रास आता कुठे गेला

भाजपसोबत जाण्यावर टीका करताना सावंत म्हणाले, बंडखोर आमदार भाजपसोबत आहेत. परंतु हेच आमदार युतीत असताना भारतीय जनता पक्षाचे नेते आम्हाला त्रास देतात असे म्हणत होते. एकनाथ शिंदे यांनी युती असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजप आपल्याला त्रास देते आहे, आपण मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, असे जाहीरपणे सांगितले होते. आता त्याच भाजपसोबत ते जात आहेत. मग त्यांचा आता कुठे गेला असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

बंदोबस्त करूनच जाणार

संजय सावंत म्हणाले, की आपण जळगावात दोन कपड्याच्या बॅगा भरून आलो आहोत, या गद्दारांनी शिवसैनिकांना धमकी देवू नये. दादागिरी बिलकूल करू नये. त्यांनी धमकी दिल्यास त्यांचा आपण बंदोबस्त करणार आहोत. या बंडखोरांनी गुवाहाटीहून मुंबईत यावे आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी हा शिवसैनिक त्यांना निवडणुकीत गाडल्याशिवाय राहणार नाही.

यावेळी महापौर जयश्री महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच जळगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com