आम्ही बी पैलवान, एकदा होऊन जाऊ द्या!

मंत्री गुलाबराव पाटील यांची लासलगावच्या कार्यक्रमात चौफेर टोलेबाजी
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

लासलगाव : ‘तुम्ही बी पैलवान अन आम्ही बी, एकदा होऊनच जाऊ द्या.. अशा शब्दात भाजपचे (BJP) चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांचा समाचार घेत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मुंबई मराठी माणूस व शिवसैनिकांची आहे. शिवसेना (Shivsena) व मुंबईतील मराठी माणसाचे नाते काय आहे हे शिवसैनिकांपेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहित आहे, शिवसेना नसती तर मुंबईचे काय हाल झाले असते? शेवटचे पाच वर्ष सोडले तर शिवसेना व भाजपचे लवमॅरेज होते असे त्यांनी स्पष्ट केले.

Gulabrao Patil
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन गावे सक्षम करू!

श्री. पाटील येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते, त्यावेळी ते बोलत होते. ‘पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चार राज्यात मिळालेल्या यशाने ते हुरळून गेले असून या यशामुळे महानगरपालिकेबाबत भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

Gulabrao Patil
आमदार कुणाल पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांसाठी मिळवले ३६ कोटी

श्री. पाटील पुढे म्हणाले,‘ राजकारणी लोकांनी चार लोकांशी नाते चांगली ठेवली पाहिजेत. शेतकरी, पोलिस, व्यापारी, डॉक्टर हीच खरी राजकारणी लोकांची ब्लड बँक असते. त्यांच्याशी संबंध चांगले तर सर्व चांगले असे लोक म्हणतात. नाशिक व जळगाव जिल्ह्यासाठी केळी, द्राक्षे यांना फळांचा दर्जा मिळाल्याची माहिती दिली.

यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, कुणाल फाउंडेशनचे कुणाल दराडे, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, प्रकाश दायमा, डॉ. श्रीकांत आवारे, संतोष पलोड, डॉ. योगेश चांडक, शिवा सुरासे, चांदवडचे उपसभापती नितीन आहेर उपस्थित होते.

कोरोना काळात चांगली सेवा बजावणाऱ्या कोरोनायोध्दा ओम चोथानी, मिराण पठाण, नाना जेऊघाले व ज्योती जाधव यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com