Gulabrao Patil politics: गुलाबराव पाटील थेटच बोलले... 'तर अजित पवारांवरही शिंतोडे उडतील'

Gulabrao Patil; Shivsena Eknath Shinde minister directly warn dy CM Ajit Pawar-जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर विरुद्ध मंत्री गुलाबराव पाटील राजकारण तापले आहे.
Gulabrao Patil & Chhagan Bhujbal
Gulabrao Patil & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon politics: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सध्या त्यांनी जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गुलाबराव देवकर यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीपासून या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या निमित्ताने सातत्याने आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

Gulabrao Patil & Chhagan Bhujbal
Uddhav Thackeray: ठाकरे शत्रू नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना शिंदेंच्या नेत्यानं करुन दिली 'ती' आठवण; म्हणाले, '...त्यांनी याचा विचार करावा!'

माजी मंत्री देवकर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षांतराचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे ते पक्षांतर करणार या चर्चेला आणखी बळ मिळाले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात तो चर्चेचा विषय होता.

Gulabrao Patil & Chhagan Bhujbal
Manikrao Kokate On Bhujbal : भुजबळांवर बोलू नका; माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश

यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री देवकर यांना राजकीय दृष्ट्या घेरण्याचे निश्चित केले आहे. माजी मंत्री देवकर यांना कोणत्याही पक्षाने प्रवेश दिला तरी, त्या पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याचा विचार करावा. अन्यथा शिंतोडे त्यांच्यावर देखील उडतील, असे मंत्री पाटील यांनी ठणकावले आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँकेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. ही शेतकऱ्यांची बँक आहे. येथील पैसे कर्ज घेऊन त्यांनी ते कर्ज फेडलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जिल्हा सहकार उपनिबंधकांना सूचना केल्या आहेत, असेही मंत्री पाटील म्हणाले.

माजी मंत्री देवकर हे विविध आरोपांनी ग्रस्त आहेत. जळगाव नगरपालिका घरकुल प्रकरणात त्यांना चार वर्षाची शिक्षा झाली आहे. या शिक्षेला वरिष्ठ न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवावी म्हणून मी न्यायालयात दाद मागेल, असे मंत्री पाटील म्हणाले. त्यामुळे माजी मंत्री देवकर यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या अनेक सोसायट्यांचे पैसे देवकर यांनी आपल्या पतसंस्थेत ठेवले आहेत. ही पतसंस्था अडचणीत आहे. लेबर सोसायटी व त्यांच्या संस्थांचे पैसे आता मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे गुलाबराव देवकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे श्री देवकर यांना राजकीय अडचणी निर्माण करणार असे सध्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री गुलाबराव आणि विरोधातील माजी मंत्री गुलाबराव या दोघांतील राजकारण अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com