Prajakt Tanpure : 'हर घर जल' या योजनेविषयी तक्रारींचा पाढा; आमदार तनपुरेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

Har Ghar Nal Scheme : आमदार तनपुरेंनी टाळले केंद्र सरकारच्या योजनेचे उद्घाटन, कारण...
Prajakt Tanpure
Prajakt Tanpure Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: केंद्र आणि राज्य सरकारच्या 'हर घर जल' या महत्त्वाकांक्षी योजनेविषयी असलेल्या तक्रारींचा पाढा आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार लहू कानडे यांच्यासमोर मांडला. या तक्रांरीवर दोन्ही आमदारांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि काम करणाऱ्या एजन्सीला चांगलेच फैलावर घेतले. जलजीवन मिशन योजनेची बिकट अवस्था पाहून आमदार तनपुरेंनी या योजनेचे उद्घाटन टाळले.

प्राजक्त तनपुरे यांनी आमदार झाल्यानंतर त्यांची पहिलीच आमसभा होती. अशा प्रकारची आमसभा 10 वर्षांपूर्वी झाली होती. या आमसभेस राहुरी तालुक्यातील 32 गावांचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लहू कानडे, तहसीलदार चंद्रजित रजपूत, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prajakt Tanpure
Ahmednagar Political News : प्रयत्न अजित पवार गटाचे अन् बॅनर लागले भाजप, शिवसेना शिंदे गटाचे...

"अनेक वर्षानंतर झालेल्या आमसभेत अनेकांनी सार्वजनिक योजनांविषयी अडचणी मांडल्या. केंद्र आणि राज्य सरकारने सुरु केलेल्या 'जलजीवन मिशन' या योजनेबाबत सर्वाधिक अडचणी होत्या. या कामासाठी नेमलेल्या एजन्सीने सर्व्हे केले आहेत, ते फिल्डवर न करता घरी बसून केले आहेत. या योजनेची केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली. पंचायत समितीच्या प्रांगणात विकासाचा रथ आला होता, त्या रथावर देखील जलजीवन मिशन योजनेची सर्वात मोठी जाहिरात केली होती".

"या रथाच्या उद्घाटनाला मला बोलवले. पण मी ते टाळले. राहुरी तालुक्यात अगोदरच या योजनेविषयी गाव सरपंच, सदस्य आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत. अधिकारी, सरपंच, सदस्य यांची एकत्रित आमसभा बोलावून सर्व तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या", असे आमदार प्राजक्त तनपुरेंनी सांगितले.

जलजीवन मिशन योजना राबविण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. वेळोवेळी सूचना करून देखील योजनेच्या कामासाठी कोणी ठेकेदार नेमले ? कोणाला ठेका दिला ? तो कोणत्या पक्षाचा आहे ? याचे काही घेणे देणे नाही. ठेकेदाराने मात्र काम लवकर सुरु करावे, या योजनेच्या अवस्थेमुळे योजनेचे अपयशच दिसत असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

वरशिंदे, वाबळेवाडी योजनेचे अद्याप काम सुरु झालेले नाही. यास कोणी विरोध करीत आहे का ? कोणाचा राजकीय दबाव आहे का ? असे प्रश्न उपस्थित करून हे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास पोलिस कारवाई सुरू करून संबंधित अधिकारी निलंबित करण्याचा आदेश आमदार तनपुरे यांनी दिला.

यावर गटविकास अधिकारी यांनी आठ दिवसांची मुदत मागवून घेतली. आमदार तनपुरे (Prajakt Tanpure) आणि आमदार कानडे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत, सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिल्या.

(Edited by- Ganesh Thombare)

Prajakt Tanpure
Ram Shinde Vs Vikhe : राम शिंदेंचं विखेंना 'ओपन चॅलेंज'; म्हणाले," 2024 ला मीही खासदार असणार!"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com