Ahmednagar Political News : प्रयत्न अजित पवार गटाचे अन् बॅनर लागले भाजप, शिवसेना शिंदे गटाचे...

MLA Kiran Lahamate : अकोले उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीवरुन महायुतीत श्रेयवाद ? आमदार किरण लहामटे यांचे स्पष्टीकरण.
MLA Kiran Lahamate
MLA Kiran Lahamatesarkarnama
Published on
Updated on

- राजेंद्र त्रिमुखे

नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या अकोले उपजिल्हा रुग्णालयाच्या कामावरुन महायुतीत चांगलाच श्रेयवाद सुरु झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी पाठपुरावा करुन मंजुर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाचे भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून बॅनर लागल्याने श्रेयवाद उफाळला आहे.

त्यामुळे प्रयत्न अजित पवार Ajit Pawar गटाचे अन् बॅनर लागले भाजप, शिवसेना शिंदे गटचे असे चित्र निर्माण झाले आहे. यावर आमदार किरण लहामटे Kiran Lahamate यांनी पाठपुरावा करु मंजुरी मिळविल्याचे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेत दिले. अकोले या आदिवासी बहुल भागात मोठ्या प्रयत्नानंतर उपजिल्हा रुग्णालयास राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी दिली.

MLA Kiran Lahamate
Kamal Nath Meet High Command : दारुण पराभवानंतर कमलनाथ हायकमांडच्या दरबारी; राजीनाम्यासाठी दबाव?

यासाठी सुरुवातीला 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी दिली आहे. मात्र रुग्णालयाच्या मंजुरी नंतर महायुती Mahayuti मधील भाजप, शिवसेना शिंदे गटाकडून लागलेल्या बॅनर मधून श्रेयवाद सुरू झालेला असताना उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी केलेल्या प्रयत्नांचा पाढाच आमदार किरण लहामटे यांनी वाचला.

संगमनेरमध्ये उपजिल्हा रुग्णालय असताना अकोले इथे दुसरे उपजिल्हा रुग्णालयास परवानगी देता येत नव्हती. मात्र अकोले तालुका आदिवासी तालुका असल्याने दुर्गम भागात डोंगर-दऱ्यात राहणाऱ्या आदिवासी जनतेसाठी अकोल्यात उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता होती. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नजरेत आपण आणून दिली.

अजित पवारांनी विशेष बाब म्हणून अकोले इथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरीसाठी अनुकूलता दाखवत त्यांच्या यंत्रणेने पूर्ण प्रयत्न केले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांनीही यात मदत केली. अखेर मी केलेल्या पाठपुराव्यातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकोले उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितले.

MLA Kiran Lahamate
Maratha Reservation: मराठा आरक्षणात नवा अडथळा ; उद्या सुनावणी

रुग्णालयास मंजुरीनंतर अकोल्यात भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे आदींचे लागलेले. यावर बोलताना आमदार लहामटे म्हणाले, अकोल्यासाठी माझ्या मागणी नंतर विशेष बाब म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले प्रयत्न, आरोग्य मंत्री सावंत यांच्या कडे केलेला पाठपुरावा यामुळे महायुती सरकारने उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुती म्हणून श्रेय घेण्यास हरकत नाही, मात्र कोणी माझ्यामुळेच रुग्णालयाला परवानगी मिळाली, असे सांगत असेल तर तालुक्यातील जनतेला कोणी प्रयत्न केले आणि कुणामुळे उपजिल्हा रुग्णालय होणार आहे याची माहिती आहे. आता आपले पुढचे "टार्गेट" एमआयडीसीच्या मंजुरीचे असेल असेही सांगण्यास लहामटे विसरले नाहीत.

Edited By : Amol Sutar

MLA Kiran Lahamate
Drug Mafia Lalit Patil: ललित पाटील प्रकरणात वैद्यकीय अधिकारी डॉ. देवकाते यांना अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com