Shinde Group Politics: खासदार हेमंत गोडसेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

Nashik Police News: रवींद्र गाढवे, संदीप गाढवे यांनी आपल्या साथीदारांसह खर्जुल यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama

Shivsena Politics News: नाशिक जिल्ह्यात गोळीबार आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी रात्री शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नितीन खर्जुल यांच्यावर एका गटाने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

रविवारी मध्यरात्री मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. त्या पाठोपाठ नाशिक रोडलाही शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्यामुळे नाशिक रोड परिसरात तणावाचे वातावरण होते.

Crime News
Porsche Crash Case: ससूनच्या डॉक्टरांशी टिंगरेंचा काय संबंध? अंबादास दानवे म्हणाले...

सिन्नर फाटा भागातील रवींद्र गाढवे याचा वाढदिवस साजरा करण्यावरून हा वाद झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा केला जात होता. त्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

त्यामुळे माजी नगरसेविका खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल यांनी त्यांना हटकले. या वादातून रवींद्र गाढवे आणि भाऊ संदीप गाढवे यांनी आपल्या सहकाऱ्यांवर खर्जुल यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

खर्जुल हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचे ते निकटवर्ती आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.

सिन्नर फाटा भागातही तणाव होता. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. यानंतर हल्लेखोर गाढवे यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भागात कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चढाओढ होती. आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सध्या शहराच्या विविध भागात नवे नेतृत्व संधी शोधत आहे.

यातून प्रस्थापित राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने असे वादाचे प्रसंग घडत असतात. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले आहेत. नाशिक रोड भागात राजकीय पक्षांमध्ये अधिक टोकाचा संघर्ष सुरू असल्याने या घटनेला महत्त्व दिले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com