Pune News: कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत. या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी त्यांच्यामागे कोणत्या राजकीय व्यक्तींचा वरदहस्त आहे, याची चर्चा सुरु असताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुण्यातील आमदार सुनील टिंगरे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
बिल्डर बापाला अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, काही पोलिस तर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर यांची यंत्रणा कामाला लागली होती, असे प्राथमिक तपासात आढळले आहे.
"ससूनचे डॉक्टर, त्यांनी इमान विकून केलेला कारभार याचा आमदार सुनील टिंगरे यांच्याशी काही संबंध आहे का, हे देखील तपासले गेले पाहिजे. अपघात झाल्यावर आमदार टिंगरे पोलिस ठाण्यात का जाऊन बसले होते, याचे उत्तर अजून त्यांनी दिलेले नाही, या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढली पाहिजे," असे अंबादास दानवे यांनी एक्सवर म्हटलं आहे.
पुणे अपघात प्रकरणी सरकार अजूनही गंभीर नाही, असे अधिकारी नेमले असतील तर तपासाच्या शेवटी काय समोर येईल, हे कोणीही आत्ताच सांगू शकेल, त्याला चौकशीचा ड्रामा करण्याची गरज नाही, असे दानवे यांनी म्हटले आहे.
याप्रकरणात पोलिसांवर दबाव टाकून काही राजकीय नेतेमंडळीही हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप केला त्यातच, अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून तपास यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत होता. अपघात दोन जणांना चिरडून मृत्यू झाला आहे. या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी ब्लड सॅम्पलप्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनील टिंगरे पहिल्या दिवसांपासून मीडियाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांच्यावर अपघातातील अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी दबाव निर्माण केल्याचा गंभीर आरोप करत विरोधकांनी त्यांना घेरण्यासाठी पूर्णपणे फिल्डिंग लावली आहे, टिंगरेंना याबाबत वेळोवेळी खुलासा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.