Nashik Lok Sabha: गोडसेंची उमेदवारी 'राम भरोसे'; काळारामाच्या दर्शनानंतर रामलल्लाच्या चरणी...

Nashik Lok Sabha Election 2024: नाशिकची उमेदवारी मिळावी यासाठी खासदार गोडसे गेले तीन महिने जंग जंग पछाडत आहेत. महायुतीचे घटक पक्ष व त्यांचे नेते यांच्यात नाशिकची उमेदवारी मिळावी यासाठी प्रचंड स्पर्धा आहे.
Hemant Godse
Hemant GodseSarkarnama

Hemant Godse News: महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे दर्शन पदोपदी घडत आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा रोज गुंतागुंतीचा होत आहे. त्यामुळे आता इच्छुकांनाही पक्षाच्या नेत्यांऐवजी देवाचा धावा करणे सोयीचे वाटू लागले आहे, की काय अशी स्थिती आहे. श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर काल नाशिक शहरातील बहुतांशी पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी काळारामाचे दर्शन घेतले.

नेत्यांच्या गर्दीत एकमेकांना नमस्कार, चमत्कार करण्याबरोबरच अगदी पाय धरण्यापर्यंतही नेत्यांनी संकोच केला नाही. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल पंचवटीत श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतले. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना पदस्पर्श करून त्यांचेही आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. यातील कोणत्या नेत्याने कोणाला आशीर्वाद दिला आणि कोणाला शुभेच्छा दिल्या हा चर्चेचा विषय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकची उमेदवारी मिळावी यासाठी खासदार गोडसे (Hemant Godse) गेले तीन महिने जंग जंग पछाडत आहेत. महायुतीचे घटक पक्ष व त्यांचे नेते यांच्यात नाशिकची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे एकमेकांबरोबर राहून राजकारण करणाऱ्या या नेत्यांना परस्परांवरच विश्वास राहिलेला नाही. सहकारी पक्षाच्या नेत्यांबाबत संशय वाढू लागला आहे. पडद्यामागून उमेदवारीला अपशकुन करीन याचा नेम नाही. त्यामुळे नेत्यांचा धावा करण्याबरोबरच इच्छुकांनी आता देवाचा धावाही सुरू केला आहे.

खासदार गोडसे यांनी काल राम नवमीच्या निमित्ताने नाशिकच्या काळाराम मंदिरात (Kalaram Temple) दर्शन घेतले. आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर ते सकाळीच विमानात बसून थेट अयोध्येतील (Ayodhya) रामाचा धावा करण्यासाठी पोहोचले उमेदवारी मिळावी, असे साकडे त्यांनी अयोध्येतील रामाला घातले आहे. या वेळी त्यांनी काही साधूंच्या भेटीदेखील घेतल्या आहेत. त्यामुळे आता श्रीराम त्यांना केव्हा आणि कधी पावतो याची उत्सुकता आहे.

Hemant Godse
Utkarsha Rupwate News: उत्कर्षा रूपवतेंच्या 'वंचित'मधील एन्ट्रीने शिर्डीत तिरंगी लढत होणार?

महायुतीतील नाशिकच्या (Nashik) जागेचा वाद खूपच चिघळला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि इच्छुक उमेदवार मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल उघड नाराजी याची व्यक्त केली. उमेदवारीची अपेक्षा करता करता त्यांच्यामध्येदेखील निराशा आली की काय असे दिसून आले. त्यामुळे भुजबळ यांनी 'कोणालाही उमेदवारी द्या. कोणालाही जागा सोडा. मात्र, किमान 20 मे पर्यंत' (हा मतदानाचा दिवस आहे) असा उपरोधिक टोला महायुतीच्या नेत्यांना लगावला होता.

Hemant Godse
Nashik Lok Sabha: अजितदादांचा सातारा मतदारसंघ घेऊन भाजपकडून नाशिकसाठी शिंदे गटाची कोंडी?

दरम्यान, आज सकाळी 11 वाजता महायुतीच्या नेत्यांची पत्रकार परिषद नियोजित होती. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चार जागांबाबत आणि तेथील उमेदवारीबाबत घोषणा करणे अपेक्षित होते. मात्र, हे नेते विविध उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुंबई बाहेर होते. त्यामुळे ही पत्रकार परिषद होऊ शकलेली नाही. आता सायंकाळी याबाबतची घोषणा अपेक्षित आहे. किमान सायंकाळी तरी नाशिकचा उमेदवार कोण मंत्री छगन भुजबळ, शिवसेना शिंदे गटाचे खासदार गोडसे की जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यावर शिक्कामोर्तब होईल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com