विधानसभा अध्यक्ष निवडीला आव्हान देणाऱ्या महाजनांना न्यायालयात 10 लाख भरावे लागणार

विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना उच्च न्यायालयाने (High Court) 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला महाजन यांनी आव्हान दिले होते. यावरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने ही पूर्वअट ठेवली आहे.

विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिकांवर आज उच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली. हे आव्हान आवाजी मतदानाला देण्यात आले होते. विधिमंडळाच्या नियमदुरुस्तीला जनहित याचिकेद्वारे न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा आक्षेप यावर राज्य सरकारने घेतला. या प्रकरणी जनक व्यास आणि आमदार गिरीश महाजन यांच्या जनहित याचिका सुनावणी योग्य नाहीत, असेही म्हणणे राज्य सरकारने मांडले. यावर जनहित याचिका ऐकण्यासाठी न्यायालयाने 10 लाख रुपये जमा करण्याती पूर्वअट महाजनांना घातली. महाजन यांनी वकिलांमार्फत रक्कम भरू, असे न्यायालयात सांगितले आहे.

Girish Mahajan
रशियाला दणका! आता 'एसबीआयने'ही घातले आर्थिक निर्बंध

थेट मतदारांकडून होणाऱ्या मतदानात गुप्त मतदान आवश्यक असते. मात्र, यात मतदार मतदान करत नाहीत, त्यामुळे गुप्त मतदान आवश्यकच हा याचिकेतील दावा चुकीचा आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ही थेट निवडणूक नसते, अप्रत्यक्ष निवडणूक असते. म्हणजेच थेट मतदार नव्हे तर मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मतदान करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा त्याच्याशी काही संबंध नसतो आणि म्हणून नागरिकाला नियमबदलाला आव्हान देता येत नाही, असेही राज्य सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावरील पुढील सुनावणी 8 मार्चला होणार आहे.

Girish Mahajan
ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

चव्हाण, थोपटे, वरपूडकर शर्यतीत

दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष निवड करण्यावर तिन्ही पक्षांचे एकमत आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे, सुरेश वरपुडकर ही नावे काँग्रेस अध्यक्षांकडे पाठविण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात काँग्रेसकडे एकही प्रभावी पद नसल्याने संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यास पुणे जिल्ह्यात सकारात्मक संदेश जाईल, असा काँग्रेसमधील एका गटाचा युक्तिवाद आहे. तर, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण यांचा गट सुरेश वरपुडकर यांच्या नावासाठी आग्रही आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com