हिदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालीसाचे पठण!

शहादा शहरात श्रीराम जन्म उत्सवाच्या मिरवणुकीसाठी जमलेल्या रामभक्तांची निराशा झाली.
Shahada Agitation
Shahada AgitationSarkarnama
Published on
Updated on

शहादा : शहरातून (Shahada) श्रीराम नवमी निमित्त निघणारी श्रीराम जन्मोत्सवाची (Shreeram Birthday) मिरवणूक पोलिस (Police) प्रशासनाने वाद्य वाजवण्यावरून वाद झाला. मिरवणूक स्थगित केल्याने काही काळ शहरात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी ठिय्या देत हनुमान चालीसा म्हटली.

Shahada Agitation
भाजप नगरसेविकेच्या पतीकडे १५ लाखांची खंडणी मागितली

दरम्यान शहरातील चावडी चौकात श्रीराम जन्मोत्सव समिती व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. शेवटी मिरवणूक स्थगित करुन रात्री उशिरापर्यंत मंदिरा समोरील चौकात बसून हजारो राम भक्तांनी हनुमान चालिसा व राम धून सुरू केली.

Shahada Agitation
भारती पवार म्हणाल्या, होमिओपॅथी डॉक्टरांच्या पाठीशी!

गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे सण उत्सव व मिरवणूकांवर बंदी होती. दोन वर्षानंतर प्रथमच शहरात प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तर्फे मिरवणुक काढण्यात आली. सायंकाळी पाच वाजता शहरातील शहीद लालदास चौकात असलेल्या श्रीराम मंदिरापासून सजवलेल्या रथावर श्रीरामाची भव्य प्रतिमा ठेवून मिरवणुकीला सुरवात होणार होती.

परंतु वाद्यांवरुन पोलिस प्रशासन व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये वाद झाला. यावेळी उपस्थित पाच ते सहा हजार राम भक्तांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलिस कुमक वाढविण्यात आली. रामभक्तांनी पोलिसांच्या विरोधात चौकात बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.

शहादा पालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, मराठा महासंघाचे श्याम जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अजय शर्मा आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पर्यायाने राम भक्तांनी सजवलेल्या रथासमोरच अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवून अखंड रामधुन व हनुमान चालिसा सुरू केली ती रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्री कळमकर,शहादयाचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com