भाजप नगरसेविकेच्या पतीकडे १५ लाखांची खंडणी मागितली

तक्रार अर्ज करून ब्लॅकमेल केल्याने पोलिसांची कारवाई
Dhananjay Mane & Priyanka Mane
Dhananjay Mane & Priyanka ManeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शहरातील (Nashik) विविध पोलिस ठाण्यांकडे वारंवार खोटे अर्ज करून पंचवटीतील भाजपच्या (BJP) नगरसेविका प्रियंका माने (Priyanka Mane) यांचे पती धनंजय माने यांच्याकडे १५ लाखांची खंडणी (Ransome) मागितली. खंडणी न दिल्यास ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्या संशयिताविरुद्ध पंचवटी पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Dhananjay Mane & Priyanka Mane
जुगारी पोलिसाच्या चाकु हल्ल्यात सासरा ठार, पत्नी, सासु जखमी!

पंचवटीतील भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांचे पती धनंजय ऊर्फ पप्पू माने यांना धमकावत संशयित अनिकेत निकाळे (रा. महालक्ष्मीनगर, हिरावाडी रोड, पंचवटी) याने पंचवटी पोलिस ठाण्यासह अन्य ठिकाणी खोटे अर्जफाटे केले होते. यात पप्पू माने यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचेही आरोप केले होते. त्यामुळे माने यांनी पोलिस ठाण्यात जाऊन यासंदर्भात जबाबही लिहून देत आरोपांचे खंडन केले होते.

Dhananjay Mane & Priyanka Mane
`भुजबळांनी संघर्ष खूप केला पण वाचन मात्र कमी`

मात्र, संशयिताने माने यांच्या मित्राची भेट घेत त्यांना सांगितले, की ‘तुझा मित्र पप्पू माने यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ केली, म्हणून मी पोलिसांत तक्रार केली असून, लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे सांग. माने याने मला १५ लाख रुपये दिले, तर तक्रार मागे घेतो, त्यात तडजोड करीत सात ते आठ लाख रोख व माझा एक व्यक्ती महापालिकेत कामाला लावावा, अशी मागणी केली.

यामुळे गेल्या आठवड्यात मित्राच्या मध्यस्थीने माने यांनी संशयिताची भेट घेत मला विनाकारण का त्रास देतोय, अशी विचारणा केली. त्यावेळी संशयिताने माने यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. यानंतरही संशयिताने माने यांच्या मित्राला वारंवार फोन करून रकमेची मागणी केली. अखेर संशयिताने माने यांना धमकावल्याने माने यांनी त्यास नवीन आडगाव नाका येथील ॲक्सीस बँकेच्या शाखेतून ५० हजार रुपये काढून दिले. मात्र, माने यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठत ही बाब व घडलेला प्रकार पंचवटी पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस चौकशी करणार

निवडणुकांचा हंगाम सुरू झाला, की असे गैरप्रकार घडण्याची शक्यता असते. राजकीय वर्चस्वातूनही असे प्रकार घडतात. त्यामुळे नगरसेविकेच्या पतीकडे खंडणी मागत त्यांना बदनाम करण्याची धमकी देणे, ही बाब गंभीर असल्याचे सांगत पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी काही पुरावेही हस्तगत केले आहेत. तसेच याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. पोलिस प्रशासनाला विनाकारण कामाला लावणारा संशयित अनिकेत निकाळे हा नेमके कुणाच्या सांगण्यावरून अर्जफाटे करीत होता. यात काही राजकीय व्यक्तींचा हात आहे का, या बाबीही सूक्ष्मपणे तपासल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

राजकीय विरोधकांनी असे कितीही कुभांड रचले, तरी काहीही फायदा होणार नाही. संबंधित व्यक्तीच्या मागे काही राजकीय विरोधक असून, ते इतक्या खालच्या थराला जातील, अशी अपेक्षा नव्हती. --धनंजय (पप्पू) माने, तक्रारदार

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com