Hindu Muslim tension Ahilyanagar
Hindu Muslim tension Ahilyanagar Sarkarnama

Hindu Muslim tension Ahilyanagar : 'आय लव्ह मोहम्मद' रस्त्यावर लिहिलं..; हिंदू-मुस्लिम वाद पेटला, शहरात घुसणाऱ्या मुस्लिम जमावावर 'लाठीचार्ज'

Ahilyanagar Police Lathicharge on Muslim Protesters at Kothala Bus Stand : भावना दुखवल्याप्रकरणी आंदोलन करत असलेल्या मुस्लिमांवर अहिल्यानगर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
Published on

Ahilyanagar police lathicharge : हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात 'आय लव्ह मोहम्मद' रस्त्यावर रांगोळीने लिहिल्याने अहिल्यानगरमध्ये मुस्लिम समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. कोठला बसस्थानकासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत असलेल्या आक्रमक मुस्लिम समाज अन् पोलिसांमध्ये वाद झाला.

आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांमधील एक जमाव शहराच्या दिशेने चाललो होता. पोलिसांनी शातंतेचे आवाहन करून देखील, हा जमाव आक्रमक होता. या जमावाबरोबर वाद झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे कोठला परिसरात तणावाचा वातावरण होते. जमावातील 40 ते 45 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या तणावाला सुरूवात कोतवाली पोलिस ठाण्यापासून सुरूवात झाल्याची माहिती समोर येत आहे.

अहिल्यानगर शहरात सकाळी हिंदू संघटनेने रॅली काढली होती. या रॅलीत, बारा तोटी कांरजा परिसरातील रस्त्यावर रांगोळीने 'आय लव्ह मोहम्मद' लिहिले होते. त्याभोवती फुलांच्या पाकळ्या देखील होत्या. रस्त्यावर 'आय लव्ह मोहम्मद' लिहिल्याची माहिती मिळताच तिथं मुस्लिम युवक एकत्र आले. याचा जबाब विचारण्यासाठी मुस्लिम समाजाने कोतवाली पोलिसांकडे (Police) धाव घेतली.

कोतवाली पोलिसांकडून कारवाई व्हावी यासाठी मुस्लिम (Muslim) युवकांनी ठाण्यासमोरील रस्त्यावर बसून घेतलं. इथं मोठ्याप्रमाणत मुस्लिम जमाव जमला होता. पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याच्या आश्वासनानंतर देखील मुस्लिमांचा जमाव रस्त्यावर बसून होता. या जमावाला समजावून देखील ऐकत नव्हता. पोलिसांबरोबर वाद झाल्यानंतर, इथं जमावावर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला.

Hindu Muslim tension Ahilyanagar
Ahilyanagar flood measures : अतिवृष्टीचा फटका, 3500 ग्रामस्थांचं स्थलांतर; मंत्री विखे 'अ‍ॅक्शन मोड'वर, ओढे-नाल्यावरील अतिक्रमणावर 'बुलडोजर' फिरणार

दरम्यान, कोतवाली पोलिसांनी आय लव्ह मोहम्मद रस्त्यावर रांगोळीद्वारे लिहिणाऱ्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्याचवेळी मुस्लिम समाज कोठला बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात एकत्र आला. पोलिसांना याची माहिती मिळताच, कोठला परिसरात बंदोबस्तात वाढ केली.

Hindu Muslim tension Ahilyanagar
RSS dismissal demand Nagpur : शताब्दी वर्ष साजरा करणाऱ्या 'RSS'ची खोडी; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

एकत्र जमलेल्या मुस्लिम जमावाने इथं कोठला बसस्थानकासमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. हे आंदोलन तब्बत दीड तास सुरू होते. पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली होती. धार्मिक भावना का दुखवल्या, याचा जाब विचारण्यासाठी आंदोलक करत असलेल्या एका जमावाने शहराकडे जाण्याची तयारी केली. पोलिसांनी ती हेरली. त्यातून पोलिसांनी शांततेचं आवाहन केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगितले. तरी देखील मुस्लिम जमाव ऐकायला तयार नव्हता. यातून पोलिसांशी वाद घातला.

जमाव शहराच्या दिशेने चालला होता...

शहराच्या दिशेने घेतलेल्या मुस्लिम जमावाला रोखताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यातून उडालेल्या संघर्षात पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. यामुळे कोठला परिसरात तणावाचे वातावरण झाले. पोलिसांच्या लाठीचार्जपासून वाचण्यासाठी मुस्लिमांचा जमाव रस्त्याने पळत होता. यातून अनेक जण किरकोळ जखमी झाले. जमावाला चिथावणी देणाऱ्या 40 ते 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बाजारपेठेत तणावपूर्ण शांतता

या तणावानंतर शहरातील प्रमुख शाळा, काॅलेजमधील मुलांना घरी सोडून देण्यात आलं आहे. शहरातील मध्यवती बाजारपेठ बंद होती. समाज माध्यमांवर वेगवेगळे संदेश फिरत असल्याने ऐन सणासुदीत बाजारपेठे सुरू ठेवण्याविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. तसेच सायबर सेल अ‍ॅक्शन मोडवर चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिस अधीक्षक मैदानात

मुस्लिम जमावाच्या आक्रमकतेवरून पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चांगलीच दखल घेतली. पोलिस अधीक्षक घार्गे स्वतः हेल्मेट घालून कोठला बसस्थानक परिसरात उपस्थित होते. कोतवाली पोलिस ठाण्यासह तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका, एमआयडीसी, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, एसआरपीएफची एक तुकडी तैनात केली होती. त्यामुळे आक्रमक जमावाला काही वेळातच नियंत्रणात आणण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com