Tension in Manmad : वादग्रस्त पोस्टमुळे मनमाड शहर रात्रभर तणावाखाली!

Hindu organization march against controversial post on social Media-मनमाड शहरात जमावाने मोर्चा काढून वादग्रस्त पोस्ट टाकणाराला अटक करण्याची मागणी केली.
Social Media Post viral in Manmad
Social Media Post viral in ManmadSarkarnama
Published on
Updated on

Hindtwavadi Organzation Manmad : राज्यातील कोल्हापूरसह अन्य काही शहरांप्रमाणेच घटना संवेदनशील मनमाड शहरात घडली. सोशल मीडियावर महापुरुषाबद्दल तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. पोस्ट टाकणाऱ्याच्या अटकेसाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह युवकांनी मध्यरात्री इंदौर- पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. (Morcha by hndutwavadi peoples in Dhule city on controversial post)

मनमाड (Nandgaon) या घटनेमुळे शहरात रात्रभर तणाव होता. पोलिसांनी (Police) दक्षता घेतल्याने तणाव निवळला. याबाबत राज्य शासनाने (Maharashtra Government) कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Social Media Post viral in Manmad
Maharashtra Politics : वेगळी विचारधारा, राजकीय पक्षही वेगळे; तरी विलासराव अन् गोपीनाथ मुंडेंच्या मैत्रीची आजही चर्चा...

आज याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना निवेदन दिले. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे रात्रीपासून निर्माण झालेला तणाव निवळला.

शुक्रवारी एका तरुणाने सोशल मीडियावर महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ती व्हायरल झाल्याने काही युवकांनी त्याबाबत आक्षेप नोंदवला. ही बातमी शहरभर पसरली. त्यामुळे या पोस्टमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, ही पोस्ट व्हायरल झाल्याने शहरातील शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह तरुण रात्री अकरा ते एक वाजेदरम्यान गावात जमत होते. विविध घोषणा देत त्यांनी संताप व्यक्त केला. संप्तत जमावाने पोलिस ठाणे गाठले. संबंधितावर कारवाई न झाल्याने या संतप्त जमावाने पोलिस ठाण्याजवळ इंदूर- पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर तसेच शांततेचे आवाहन केल्यानंतर मध्यरात्री हा तणाव निवळला.

Social Media Post viral in Manmad
Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री भारती पवार आमदारांच्या मदतीला धाऊन आल्या!

तरुणाने सोशल मीडियावर महापुरुषाबद्दल पोस्ट टाकल्यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दक्षता घेत परिस्थिती आटोक्यात आणली. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. शहरात शांतता आहे.

- बाळासाहेब थोरात, पोलिस निरीक्षक, मनमाड

Social Media Post viral in Manmad
Suhas Kande News : राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आमदार कांदेंची कोंडी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com