Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री भारती पवार आमदारांच्या मदतीला धाऊन आल्या!

Maharashtra Politics On Drought, Dr. Bharti Pawar meets CM-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत, सबंध नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी केली.
Dr. Bharti Pawar with CM Eknath Shinde
Dr. Bharti Pawar with CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Politics on Drought News : नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी केवळ तीन जिल्हे दुष्काळग्रस्त यादीत आहेत. त्यामुळे विरोधकांनी या विषयावर रान पेटले असून, सत्ताधारी आमदार अडचणीत आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार त्यांच्या मदतीला धाऊन आल्या आहेत. (Nashik is facing serious drought and water issue due to scarcity)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. नाशिक (Nashik) जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

Dr. Bharti Pawar with CM Eknath Shinde
BJP News : ऐन निवडणुकीच्या प्रचारातच घात झाला,भाजप नेत्याची निर्घृण हत्या; हल्ल्याच्या घटनेने खळबळ

राज्य शासनाने राज्यातील १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. यासाठी संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय राजमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे.

याबाबत, केंद्रीय राजमंत्री डॉ. पवार यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. पवार यांनी तालुक्यांमधील वस्तुस्थिती मांडली. या वेळी भाजपचे आमदार डॉ. राहुल उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झाले असून, अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी अनेक तालुक्यांत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्याने खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. परिणामी कोरडवाहू शेती तसेच फळबागा व बागायती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना कृषीविषयक अनुदान मिळणे गरजेचे आहे. या विषयावर विरोधकांकडून आंदोलने होत आहेत. त्यात राज्य शासन तसेच सत्ताधारी आमदारांची कोंडी झाली आहे. त्यामुळे डॉ. पवारदेखील त्यांच्या मदतीला धाऊन आल्याचे चित्र आहे.

Dr. Bharti Pawar with CM Eknath Shinde
Suhas Kande News : राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आमदार कांदेंची कोंडी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com