Suhas kande v/s Shivsena Thackeray : गेले काही दिवस दुष्काळ जाहीर करावा, या विषयावर राज्यात राजकारण सुरू होते. शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केल्यावर त्यातून तालुका वगळल्याने राजकारण पेटले आहे. या विषयावर आमदार सुहास कांदेंना विरोधकांनी चांगलेच अडचणीत आणले आहे. (Now after Ncp Shivsena came in the political ground against Suhas Kande)
आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या विरोधात शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) आज मैदानात उतरणार आहे. गुरुवारी या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज्य शासनाचा (Maharashtra Government) निषेध करीत आंदोलन केले होते.
राज्याच्या विविध भागात यंदा दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे या प्रश्नावर शेतकरी, विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्याने हा विषय मागे पडला होता. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी शासनाच्या शिष्टाईनंतर उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत दुष्काळाच्या विषयावर नागरिकांत खदखद होण्याची शक्यता आहे.
याबाबत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार म्हणजे सुहास कांदे आणि त्यांचा नांदगाव मतदारसंघ होता. पालकमंत्री दादा भुसे आणि आमदार कांदे एकाच गटाचे तर नांदगाव मतदारसंघात आमदार कांदे असले तरीही विरोधात राज्याचे मंत्री छगन भुजबळ आहेत. त्यादृष्टीने नांदगाव तालुका हाय प्रोफाइल तालुका मानला जातो. .याबाबत आमदार कांदे यांनी यापूर्वीच पावसाने दिलेला खंड, पिकांची आणेवारी तसेच टंचाई या तिन्ही निकषांत नांदगाव तालुका बसतो, असा दावा आमदार कांदे यांनी केला होता.
दुष्काळाच्या झळा या तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात आहे. पावसाळ्यातच अनेक गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. त्यामुळे पीकविम्याची भरपाई, पाणी, रोजगार व दुष्काळाच्या झळा या विषयावर काल राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आंदोलन केले. आज शिवसेना याबाबत आंदोलनात उतरणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आमदार कांदे यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.