Dhule BJP : गिरीश महाजन बेफाम नगरसेवकांना लगाम घालण्यात अपय़शी?

BJP leaders success to get funds for Dhule city-शहराच्या विकासाच्या योजनांच्या गुणवत्तेअभावी निधी कुठे गेला असा प्रश्न विचारला जात आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

निखिल सूर्यवंशी

Dhule BJP News : धुळे महापालिकेत मतदारांनी मोठ्या अपेक्षेने भाजपला एकहाती सत्ता दिली. पक्षाच्या नेत्यांनी शहरासाठी मोठा निधी आणल्याचे चित्र रंगविले. मात्र, भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि कामांतील गुणवत्तेअभावी हा निधी किती सार्थकी लागला असा गंभीर प्रश्न नागरिक विचारीत आहेत. (Dhule People are in confusion about funds utilisation of devolopment)

भारतीय जनता पक्षाची (BJP) धुळे (Dhule) महापालिकेत सत्ता आहे. सहा महिन्यांनी नव्याने निवडणुका (Elections) होणार आहेत. मात्र गेल्या साडे चार वर्षातील कारभार पाहता पक्षाच्या नगरसेवकांना पुढे काय होणार याची चिंता सतावत आहे.

Girish Mahajan
ACB Nashik Trap : महसूल सप्ताहातच तहसीलदाराने १५ लाखांची लाच घेतली!

ज्या अपेक्षेने धुळेकरांनी भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली, त्या सत्तेचे पक्ष आणि शहर स्तरावर ऑडिट होण्याची गरज आहे. सत्तेच्या साडेचार वर्षांच्या कालावधीत शहर विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा सत्ताधारी नगरसेवकांत त्याआड संगनमताने महापालिकेत जी बेबंदशाही सुरू आहे.

या बेबंदशाहीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांना लगाम घालण्यात अपयश आले. त्यामुळे या नेत्यांबाबत देखील शहरात नाराजीचा सूर आहे.

Girish Mahajan
Sudhir Mungantiwar Claims Congress Leaders : काँग्रेस नेत्यांच्या BJP प्रवेशावर मुनगंटीवार म्हणतात, "फडणवीसांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला...

शहरालगतच्या शिरपूर, नंदुरबार शहरात गतीने विकसित होत असताना त्या धुळे शहरात ते घडलेले दिसत नाही. त्यामुळे हे का घडले याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ भाजपवर आल्याचे बोलले जाते.

भाजपमधील विविध पदांच्या वर्चस्ववादात धुळे शहराची फरफट होत असल्याचे लपून राहिलेले नाही. त्याची जाणीव स्थानिक नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकाऱ्यांना व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु, पक्षीय वर्चस्ववादातून शहरात नेमके काय घडत आहे, त्याचे काय परिणाम घडू शकतात याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. त्यांमुळेच भाजपच्या स्थानिक नेत्यांची झोप उडाली असावी.

Girish Mahajan
Amrut Bharat Station Scheme : देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार; एवढे आहे बजेट?

शहरातील १५६ कोटींची ब्रिटिशकालिन जलवाहिनी व जलकुंभ योजनेचा लाभ नाही, केंद्र पुरस्कृत भूमिगत गटार योजना अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. खड्ड्यांप्रश्‍नी जनआक्रोश होत असला तरी त्याच्याशी काही देणेघेणे नाही, अशा अविर्भावात भाजपसह महापालिका दिसते. टॉवर बगीचा, पांझरा चौपाटीवरील उद्यानाचा प्रश्‍न भिजत पडला आहे. मनपास्तरावर नियोजन व दूरदृष्टीचा अभाव असल्याने अतिक्रमणे, पार्किंग व हॉकर्स झोनचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

महापालिकेने ५७ कोटींचे कंत्राट देऊनही सगळीकडे अस्वच्छता, मोकाट जनावरे, रखडलेले अस्वच्छ पांझरा नदीचे सौंदर्यकीकरण आदी असंख्य समस्या ‘जैसे थे’ आहेत. या अपयशाचे माप सत्तेत असल्याने भाजपच्याच पदरात पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com