Pune : छत्रपती संभाजीनगरनंतर एकापाठोपाठ राज्यातील अमरावती, अहमदनगर, अकोला आणि रविवारी (दि.१४) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दोन गटांत राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील उसळलेल्या दंगलींवरुन राजकारण देखील तापलं असून एकमेकांवर आऱोप प्रत्यारोपांची चिखलफेक सुरु आहे. याचवेळी कायदा सुव्यवस्थेवरही विरोधकांकडून प्रश्नचिन्ह देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीवरुन इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी काही समाजकंटकाकडून या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. या दोन घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी(दि.१५) पिंपरी चिंचवडला विकासकामांचं उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले,राज्यात काही लोक जाणूनबुजून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणालाही दंगली घडवून देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अद्दल घडवणार असा गंभीर इशारा फडणवीस यांनी दिला.
काय म्हणाले फडणवीस?
काहीजण राज्यात मुद्दाम राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते सफल होणार नाहीत, जे अशा प्रकारे दंगली(Violence) घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. तसेच तणाव निर्माण झालेल्या दोन्ही शहरांमध्ये आता पुर्णपणे शांतता असून पोलिस सतर्क मोडवर आहेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
हा तर भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन ;खैरेंचा आरोप
शेवगाव(Shevgaon)येथील दंगलीवर भाष्य करताना ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात कुठेच जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. पण आता छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शेवगावमध्ये दोन गटात वाद झाला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांच्या काळात हे सर्वकाही घडत आहे. हिंदू आणि मुस्लीम यांना वेगळ करण्यासाठी यांच्याकडून राजकारण सुरु आहे.
मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभं असल्याने असे प्रकार घडवले जात आहे. त्यामुळे दोन गटात होणारे वाद घडवले जात आहे. मुस्लीम मतदान उद्धव ठाकरे यांना मिळू नयेत म्हणून हा सर्व प्रकार सुरु आहे. तर हा सर्व घटना म्हणजेच भाजपचं लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.