BJP Politics Madhya Pradesh : भाजपची मतपेरणी सुरू; रक्षाबंधनानिमित्त महिलांसाठी मोठी घोषणा

Shivraj Singh Chouhan : स्वस्त गॅससह राज्याच्या नोकरीतही महिलांना मिळणार ३५ टक्के वाटा
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Bhopal Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्याने मोदी सरकार नवनवीन योजना राबवत असल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर आहेत. तत्पुर्वीच रक्षाबंधनचे निमित्त करून मध्य प्रदेश सरकाने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे मतपेरणीचाच एक प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यामुळे मध्य प्रदेशसह इतर राज्यात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने येण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) एकापाठोपाठ एक मोठ्या घोषणा करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनानिमित्त राज्यातील महिलांना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी श्रावण महिन्यात स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर केवळ ४५० रुपयांना देण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर 'लाडली बहना योजने'च्या रकमेत वाढ करणार असल्याचे घोषीत केले आहे.

BJP Flag
Sanjay Raut On Ajit Pawar : राज्याच्या तिजोरीची लूट चोक्सी, मल्ल्यासारखीच; सजंय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा

भोपाळच्या जंबोरी मैदानावर महिलांची परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये राज्यभरातून महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील महिलांसाठी श्रावण भेट देताना घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, "मी एका क्लिकवर तुमच्या खात्यात राखीसाठी २५० रुपये टाकत आहे. जेणेकरून तुम्हाला राखी चांगल्या प्रकारे रक्षाबंधन सण साजरा करता येईल. १० सप्टेंबरला एक हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा होतील आणि ऑक्टोबरपासून एक हजार २५० तुमच्या खात्यात जमा होतील."

BJP Flag
Wadettiwar on Ajit Pawar : उद्धव ठाकरेंच्या सभेत जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा !

मुख्यमंत्री चौहानांनी महिलांना नोकरी देण्याबाबतही मोठी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, "माझ्या बहिणींनो, आज मी ठरवले आहे की वाढीव वीजबिलाची वसुली होणार नाही. गरीब बहिणीचे बिल दरमहा शंभर रुपये आले तर त्याची व्यवस्था केली जाईल. माझ्या बहिणींनो आणि मुलींनो, आम्ही हे देखील ठरवत आहोत की सरकारी पदांमध्ये अशी अनेक पदे आहेत, ज्यावर सरकार नियुक्त्या करते, आता त्या पदांवर किमान ३५ टक्के नियुक्त्या मुली आणि महिलांच्या असतील", असेही त्यांनी स्प्ष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com