Sharad Pawar: सरकार केव्हा पडेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही!

शरद पवार म्हणाले, निवडणुका केव्हाही घ्या आम्ही त्यासाठी तयार आहोत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : एक महिना झाला राज्यात (Maharashtra) मंत्रीमंडळ (Ministry) नाही. ही स्थिती चांगली नाही. राज्यात शेतकरी संकटात आहे. विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) बांधावर जाऊन दौरे करीत आहेत, आणि मुख्यमंत्री, (Chief Minister Eknath Shinde) स्वागत-सत्कार स्विकारीत आहेत, हे चित्र बरे नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. (Chief Minster should form a ministry immediatly in the state)

Sharad Pawar
Nashik News: मतांचा विक्रम करणाऱ्या अमृता पवारांना यंदा संधी हुकली!

ज्येष्ठ नेते शरद पवार आज धुळे दौऱ्यावर जाताना नाशिकला थांबले होते. यावेळी ते पत्राकारांशी बोलले. ते म्हणाले, एक महिना झाला आहे, अद्याप राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात आलेले नाही. असे चित्रराज्यासाठी बरोबर नाही. त्याला विलंब का लगत आहे, हे मला सांगता येणार नाही. राज्यात शक्य तेव्हढ्या लवकर मंत्रीमंडळ अस्तित्वात आले पाहिजे. राज्य सरकारचे कामकाज सुरळीत होण्यासाठी त्याची गरज आहे.

Sharad Pawar
Shivsena; मंत्री, आमदार भले जाऊ दे, शिवसेना सदैव भक्कमच राहील!

ते पुढे म्हणाले, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागांत स्थिती गंभीर आहे. शेतकरी अडचणीत आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. पेरणी केलेले सर्व वाया गेले आहे. अशा स्थितीत चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची व दिलासा देण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते या पूरग्रस्त भागाचे दौरे करीत आहेत. मात्र मुख्यमंत्री स्वागत व सत्कार स्विकारण्यात दंग आहेत. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यापासून मुख्यमंत्र्यांनी त्यापासून बोध घ्यावा.

ते पुढे म्हणाले, राज्यात पूर परिस्थिती असल्याने काम करण्यासाठी मंत्रीमंडळाची टीम असणं आवश्यक आहे. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या हा विरोधाभास सगळे बघत आहेत. मुख्यमंत्री मालेगाव दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा त्यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा केली तर त्याबाबत निर्णय घेतल्यावर बघू, असे सांगत पवार यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीवर बोलण्याचे टाळले.

निवडणुकांसाठी आम्ही तयार

राज्यातील सरकार अस्थिर आहे. हे सरकार वेळेाधीच पडेल असे बोलले जाते. ते केव्हा पडेल, या प्रश्नावर श्री. पवार म्हणाले, राज्यातील सरकार केव्हा पडेल?, निवडणुका केव्हा लागतील?, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. मात्र निवडणुका केव्हाही लागल्या तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत.

ओबीसी आरक्षणाचा निर्णय चिंताजनक

सर्वोच्च न्यायालयाने सध्या प्रक्रीया सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिव्या घेण्याचा निर्णय दिला आहे. त्याबाबत ते म्हणाले, न्यायलयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. यामुळे मोठा वर्ग नाराज होईल. हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती यामुळे निर्माण झाली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com