नाशिक : शिवसेना, (Shivsena) दोन्ही काँग्रेस महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक आहेत. सुहास कांदे (Suhas Kande) आमच्या सहकारी पक्षाचे आमदार (Coliigue MLA) आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझा वाद (No disputes with Suhas Kande) किंवा काहीच नाराजी नाही. त्यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवले जातील. (Will resolve the issue) माझ्या दृष्टीने हा वाद संपला, असे प्रतापिदन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
नांदगाव मतदारसंघाच्या जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधी वाटपावरून शिवसेनेचे आमदार कांदे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात राजकीय वाद सुरु आहे. आज यासंदर्भात श्री. कांदे यांनी भुजबळांवर गंभीर आरोप केले. यासंदर्भात श्री. भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, नांदगाव मतदारसंघ हा जसा आमदार कांदे यांचा आहे, तसाच पालकमंत्री या नात्याने मी देखील त्याचा पालक आहे. त्यामुळे या मतदारसंघाचे, श्री. कांदे यांचे काही प्रश्न असतील तर ते सोडवेल जातील. वादाचे विषय असल्यास मुख्यमंत्री अथवा अन्य नेत्यांच्या उपस्थितीत त्यावर देखील तोडगा काढला जाईल. माझा श्री. कांदे यांच्याशी काहीही वाद नाही. कोणतीही नाराजी नाही. गरज पडल्यास तसेच त्यांनी काही प्रश्न मांडल्यास चर्चा करून त्यावर देखील तोडगा काढू. त्यांचे प्रश्न सोडवू. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे सहकारी म्हणून त्यावर माध्यमांत जाऊन बोलणे टाळले पाहिजे. माझ्या दृष्टीने हा वाद आज संपला. त्यावर मी चर्चा करणार नाही.
ते पुढे म्हणाले, श्री. कांदे म्हणतात, तसा निधीचा काही वाद नाही. आमदार निधी हा आमदारांचा असतो. जिल्हा नियोजन समितीचा निधी विनियोग यंत्रणा करतात. यंदाच्या वर्षी केवळ दहा टक्के निधी प्राप्त झाला आहे. तो देखील कोरोनासाठी खर्च करण्याचे निर्देश आहेत. अद्याप या आर्थिक वर्षातील सहा महिने शिल्लक आहेत. यापुढे निधी आल्यावर श्री. कांदे यांची मागणी पूर्ण करण्याचा निश्चित विचार करता येईल.
पालकमंत्री बदला ही श्री कांदे यांची मागणी आहे. त्यावर श्री. भुजबळ म्हणाले, त्यांची मागणी असू शकते. मात्र हा निर्णय व विषय वरीष्ठांचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या कक्षेतील तो विषय आहे. त्यांना वाटल्यास योग्य निर्णय घेतील. हा जो वाद आहे त्याबाबत मी शरद पवार व मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. आम्ही सर्व महाविकास आघाडीचे घटक आहोत. भविष्यात आम्हाला एकत्र काम करायचे आहे. निवडणूकांना एकत्र सामोरे जावे लागू शकतो. त्यामुळे जाहीरपणे वादावर बोलणे बरे नाही. त्यांनी जे आरोप केले ते अतिशय दुःखदायक आहेत. ते टाळलेले बरे. त्यांनी संपर्क करावा, मी त्यांच्या प्रश्नांचे निरसन करीन हे वारंवार सांगतो आहे. मी पालक आहे. त्यांनी पालकांकडे काही हट्ट धरला तर जे शक्य असेल त्याचा जरूर विचार करू. त्यांच्याशी माझा काहीही संघर्ष नाही.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.