नाशिक : जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Nashik) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मोठे नेते आहेत. मात्र त्यांनी एव्हढी संपत्ती कशी कमवली? भाजीपाला विकुन पंचवीस वर्षात पंचवीस हजार कोटींचे मालक होता येते का?. असा प्रश्न करून भुजबळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या मंजुरी व वितरणात भ्रष्टाचार (Corruption in DPDC Committee of Nashik) केलेला आहे. ते भाई विद्यापिठाचे विद्यार्थी नव्हे तर कुलगुरू (Vice Chancellor of Bhai University) आहेत, असा आरोप शिवसेनेचे (Shivsena MLA Suhas Kande) आमदार सुहास कांदे यांनी केला.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नांदगावचे आणदार सुहास कांदे यांच्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वितरणावरून गेले काही दिवस वाद सुरु आहे. आता हा वाद राजकीय नव्हे तर व्यक्तीगत स्तरावर गेल्याचे स्पष्ट झाले. श्री. कांदे यांनी दोन दिवसांपूर्वी छोटा राजनच्या व्यक्तीचा धमकीचा फोन आल्याचा आरोप देखील केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आज त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड. नगरसेवक विलास शिंदे आदी नेते उपस्थित होते. यातील श्री. करंजकर यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता व नांदगावच्या निधीचा विचार करता तो विषय खरा असल्यास शिवसेना कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, असे सांगितले. अन्य नेत्यांनी मात्र यावर मौन राहणे पसंत केले.
यावेळी आमदार कांदे म्हणाले, श्री. भुजबळ यांच्या विरोधात मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वितरणात पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून दुजाभाव केला. नांदगावसाठी दहा कोटी मंजूर केले, त्यातील केवळ दोन कोटी मिळाले, उर्वरीत आठ कोटी थेट कंत्राटदाराला देण्यात आले. येवला मतदारसंघासाठी ८० कोटींचा निधी वर्ग केला. निधीच्या वितरणात भ्रष्टाचार होतो व ते सर्व निधी समता परिषदेशी संबंधीत कंत्राटदारांना देतात, असा माझा आरोप आहे. त्याचे माझ्याकडे भरपुर पुरावे आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न्यायालयातील याचिकेची माहिती दिली आहे. न्यायालयात लवकरच त्याचा निकाल लागेल. त्यात आम्हाला श्री. भुजबळ यांच्या मंत्रीपदाला आक्षेप नाही, मात्र त्यांचे पालकमंत्रीपद काढावे व निधी वितरणातील अन्याय दूर करावा ही मागणी आहे.
आमदार कांदे यांनी छोटा राजनच्या पुतण्याने भुजबळांविरोधातील खटला मागे घ्यावा असा धमकीचा फोन केल्याचा आरोप केला होता. अक्षय निकाळजे याने त्याचा इन्कार केला आहे. त्याबाबत विचारले असता, त्यांनी स्पष्ट विधान टाळले. ते म्हणाले, माझा पोलिस यंत्रणा व पोलिस आयुक्तांवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. नांदगाव मतदारसंघ, पालकमंत्रीपद, निधी हे सगळे प्रश्न सोडविण्याचे अंतिम अधिकार आहेत. त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? यावर त्यांनी मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना कार्यकर्ता आहे. श्री. भुजबळ यांनी ठाकरे यांच्यावर केस केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढत आहे, असे विधान करीत जास्त बोलणे टाळले. तुमच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का? यावर त्यांनी नकार देत, माझा लढा केवळ श्री. भुजबळ यांच्या विरोधात असल्याचे सांगत पत्रकार परिषद आटोपती घेतली.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.