BHR Scam News: ‘गिरीश महाजन करू शकले नाही ते करू’

रेकॉर्डिंगचे घड्याळ, पेनड्राइव्हसह छायाचित्रे न्यायालयात सादर करण्यात आले.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

Jalgaon News: मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) तुझ्यासाठी जे करू शकले नाही, ते मी करू शकतो. अन्यथा तुझ्या व तुझ्या वडिलांना दुसऱ्या गुन्ह्यात ओढले जाईल. तुमचे गोठवलेले बँक खाते उघडून देण्यासाठी संशयित ॲड. प्रवीण चव्हाण यांनी दोन कोटींची खंडणी मागीतली, असा दावा सरकारी पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा (Government pleader Surendra Kabra) यांना न्यायालयात केला. (Adv. Pravin Chavan`s bail hearing in Jalgaon court regarding BHR scham case)

या खटल्यातील संशयित ॲड. प्रवीण चव्हाण आणि शेखर सोनाळकर यांच्या जामीन अर्जावर बचाव पक्षाचा युक्तिवाद खोडून काढताना सलग तीन तास सरकार पक्षाने पुराव्यांची सरबत्ती करत म्हणणे सादर केले. उर्वरित युक्तिवाद आज होणार आहे.

Girish Mahajan
Maratha Society; फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणी `सीबीआय` जळगावात

यासंदर्भात अॅड काबरा म्हणाले, ॲड. प्रवीण चव्हाण यांनी सुरवातीला त्यांचा ज्युनिअर मोहित माहिमतुरा यांच्याहस्ते निरेाप पाठवून चाळीसगावच्या उदय पवारचा नंबर दिला. उदय पवार ने सिग्नल या मोबाईल ॲपवरून ॲड. प्रवीण चव्हाण यांच्याशी बोलणे करवून दिले. तडजोडीअंती एक कोटी २२ लाख रुपये उदय पवार याला घरी जाऊन देण्यात आले. पैसे देऊनही चव्हाण यांनी जामिनाला विरोध केला. दरम्यान, एकच महिन्यात सुनील झंवर यांचा जामीन झाल्यावर सूरजने आपल्या वडिलांना घडला प्रकार सांगितला. तेव्हा सुनील झंवर यांनी उदय पवार याची कजगाव पेट्रोलपंपावर भेट घेत पैशांची मागणी केली. तर सुनील झंवर, मुलगा सूरज झंवर आणि उदय पवार हे तिघे बोलत असतानाचे संभाषण आणि उदय पवार यांच्या वाइन शॉपमधील शूटिंग न्यायालयात सादर करण्यात आले.

Girish Mahajan
Eknath Shinde; डबल इंजिन सरकार सर्वांचा विकास करील!

ॲड. काबरा यांनी युक्तिवाद करताना फॉरेन्सिक ऑडिटर शेखर सोनाळकर हे घटना घडली तेव्हा नागपूर येथे होते. हा मुद्दा खोडताना बालकथा ‘इसाफ नीती’चा आधार घेत. ‘पर्वत महंमदकडे येऊ शकत नसला तरी महंमद पर्वताकडे जाऊ शकतो’, असा युक्तिवाद मांडत ॲड. प्रवीण चव्हाण कुठे आहे हे फिर्यादीने म्हटलेलेच नाही, असे अधोरेखित केले. सोबतच सिग्नल या मोबाईल ॲपद्वारे कशा पद्धतीने कॉन्फरन्स कॉल होऊ शकतो, हे न्यायालयात मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com