Sambhajiraje On Ajit Pawar : भाजप नेते, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. तसे असेल तर त्यांनी माझं ऐकलं असं समजायचं. या विषयावर शाह यांची भेट शक्य नाही, मात्र अजित पवार यांची मी नक्की भेट घेईन, असे स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. (There is no compramise on Phule, Shahu & Ambedkar Ideology)
सत्यशोधक समाजाचे ४१ वे अधिवेशन आज येथे (Nashik) झाले. या वेळी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील (Maharashtra) नेत्यांनी सोयीप्रमाणे आपली राजकीय भूमिका बदलू नये, असे स्पष्ट केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र, अजित पवार नव्हते. याबाबत संभाजीराजे यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, त्याचे नेमके कारण मला सांगता येणार नाही. मी अमित शाह यांची भेट घेणे शक्य नाही, मात्र अजित पवार यांची मी जरूर भेट घेईन. याबाबत नेमके काय घडलं, याची विचारणा करीन.
ते पुढे म्हणाले, राजकारणात मोठ्या पदावरील नेत्यांना माझी विनंती आहे, की शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार फक्त कागदापुरता मर्यादित ठेवायचा नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याशिवाय पर्याय नाही. त्यात कोणतीही तडजोड होऊच शकत नाही.
ते पुढे म्हणाले, शाहू महाराजांनी आपल्या हातावर भगवान शंकर गोंदला होता. त्यांचे ते सॉफ्ट हिंदुत्व म्हणता येईल. मात्र, सध्या जी ठरावीक मंडळी राजकारणात प्रॅक्टिस करताहेत त्यांना हिंदुत्व म्हणायचे का?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.