BJP v/s Amol Mitkari : आचार्य तुषार भोसलेंनी अमोल मिटकरींना म्हटले ‘रावणप्रेमी’

If Amol Mitkari raised the Ravan issue BJP & Shivsena will Answer it-मिटकरींना भाजप, शिवसेनेचे आमदार चोख उत्तर देतील, असा इशारा भाजपचे तुषार भोसले यांनी दिला आहे.
Amol Mitkari & Acharya Tushar Bhosale
Amol Mitkari & Acharya Tushar BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Amol Mitkari News : दसऱ्याला रावण दहनाची प्रथा नाही. याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून चर्चा घडवून आणू, असे सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना भाजपनेच फटकारले आहे. (Acharya Tushar Bhosale criticized Ajit Pawar group`s Amol Mitkari on Ravan Issue)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) (अजित पवार गट) (Ajit Pwar) आमदार अमोल मिटकरी यांनी विजयादशमीला रावण दहनाची प्रथा नाही, असे विधान केले होते. त्याचा भाजपकडून (BJP) निषेध करण्यात आला आहे.

Amol Mitkari & Acharya Tushar Bhosale
Maharashtra Politics : राज्य सरकारकडून गरिबांच्या वस्तूंत मापात पाप!

याबाबत भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मिटकरी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. देशात सदैव प्रभू श्रीरामाचीच पूजा होईल. अधर्माचे, वाईट गोष्टींचे प्रतीक असलेल्या रावणाचे चिरकाळ दहनच केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

आमदार मिटकरी यांनी हिवाळी अधिवेशनात जर हा मुद्दा उपस्थित केलाच तर भाजप-शिवसेनेचे सर्व आमदार या विषयावर आक्रमक होतील. मिटकरी या रावणप्रेमी आमदाराला सडेतोड उत्तरही देतील. महाराष्ट्राच्या एका आमदाराचा स्थानिक विकास निधी रावणाच्या मंदिरासाठी खर्च केला जातो, हे महाराष्ट्र विधिमंडळाचे दुर्दैव आहे. या आमदाराला रावण ‘वंदनीय’ वाटतो आणि तो रावण दहनावर शासकीय बंदी घालण्याची मागणी करतो, त्याचा त्यांनी निषेध केला आहे.

या विषयावर राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदाराला सत्ताधारी पक्षाचा मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपकडूनच आव्हान दिले जात आहे. त्याच्या विरोधात भाजप, शिवसेना (शिंदे गट) एकत्र येतील, असा इशाराही दिल्याने हा मिटकरींना इशारा की स्वपक्षाच्याच सरकारला घरचा आहेर, याची चर्चा आहे.

Amol Mitkari & Acharya Tushar Bhosale
Maratha Dhule Politics : सरकार आणखी किती बळींची वाट पाहते आहे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com