Devendra Fadanvis Criticized Eknath Khadse : जळगावात मंगळवारी (ता. २७) शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर आले आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही इशारा दिला होता. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण वातावरण चांगलेच तापले आहे.
अशात, फडणवीसांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse ) यांच्या जखमेवरच मीठ चोळलं आहे."राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आता नवीन मालक मिळला आहे, नवीन मालकाने सांगितलं तसे ते वागतात." असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना लगावला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्याची काहीच गरज नाहीये. त्यातून त्यांना काय मिळणार आहे. आता खडसेंना नवा मालक मिळाला आहे. नवीन मालकाने सांगितल्याप्रमाणे ते वागत असतात. जर खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती. परिवारात राहिले असते. नवीन मालकाकडे जावं लागलं नसतं,अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे.
तसेच, अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे आम्ही नाहीत.आम्ही जनतेचे लोक आहोत. जनतेसाठी काम करत आहोत आणि जळगावची (Jalgaon Politics) जनता आमच्या सोबत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली म्हणून ठाकरे गटाचे नेते अनिल परबांवर कारवाई करण्यात आली, मग गीता जैन आणि संतोष बांगर यांनीही अधिकाऱ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही. ज्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली त्या सर्वांवर कारवाई झाली आहे. बांगर यांच्यावरही कारवाई झाली. कुठल्या पक्षाचा व्यक्ती आहे हे महत्त्वाचं नाही. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. जो कोणी अधिकाऱ्यांवर हात उचलेल, त्याच्यावर कारवाई केलीच जाईल, असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.