Mumbai News : मुंबईत धक्कादायक घटना : ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरात घुसून पुतणीवर हल्ला

Mumbai Crime News : मुंबईमध्ये एक मोठी घटणा घडली आहे.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Crime News : मुंबईमध्ये एक मोठी घटणा घडली आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या घरात घुसून त्यांच्या पुतणीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी नगरसेविकेची पुतणी गंभीर जखमी झाली आहे. उचपारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांच्या मदतीला शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) धावून आले.

मुंबईच्या (Mumbai) बोरिवली पूर्वेतील अभिनव नगर परिसरात ही घटना घडली. खुरसंगे यांच्या घरात घुसून अज्ञातांना त्यांच्या पुतणीवर हल्ला केला. या हल्ल्यात खुरसंगे यांची पुतणी गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका खुरसुंगे यांच्या मदतीला शिंदे गटाचे सुर्वे धावून आले.

Crime News
Uddhav Thackeray Morcha : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली; ठाकरे गट काय करणार?

शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. ठाकरे गट व शिंदे गट, संपूर्ण राज्यभरात या दोन्ही गटांमध्ये सध्या वाद सुरु आहेत. मात्र, मुंबईतील या धक्कादायक घटने नंतर शिंदे गटाचे आमदार मदतीला धावले आहेत.

Crime News
Jalgaon Politics: खडसे आणि गुलाबराव पाटलांमध्ये समझोता; अब्रू नुकसानीचा दावा मागे

खुरसंगे यांच्या घरात अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रकाश सुर्वे यांना माहिती मिळाली. सुर्वे तात्काळ खुरसंगे यांच्या मदतीला धावून आले. सुर्वे यांनी रुग्णालयात जाऊन खुरसंगे यांच्या पुतणीची भेट घेतली. तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, घडलेल्या धक्कादायक घटनेचा तपास करुन आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com