Shiv Sena : अरविंद सावंत, भास्कर जाधवांना बढती, शिवसेनेच्या सचिवपदी पराग डाके

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आता निष्ठावंतांची विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे.
Shiv Sena latest news
Shiv Sena latest news sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला (shiv sena) खिंडार पाडल्यानंतर शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे सध्या पुन्हा नव्याने पक्षबांधणी करीत आहेत. उद्धव ठाकरेंकडून राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. (Shiv Sena latest news)

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आता तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.या निवडीवरुन उद्धव ठाकरे आता निष्ठावंतांची विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे.

खासदार अरविंद सावंत,आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी तर पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असल्याचे शिवसेनेच्या पत्रकात म्हटलं आहे.

Shiv Sena latest news
Pune Ganeshotsav : पुण्यातील 'ठाकरे-शिंदे सत्तासंघर्ष' पोलिसांनी रोखला..सांगितलं हे कारण..

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. या नेत्यांना आपल्या बाजुला वळवून आपलाच गट खरी शिवसेना असल्याचे शिंदेंनी दाखवले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेतील निष्ठावंतांची विशेष काळजी घेत आहे.

शिवसेनेचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची पक्षामध्ये आता बढती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाशी आक्रमकपणे संघर्ष करण्यास शिवसेना मैदानात उतरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com