भगवान महावीरांचा संदेश स्वीकारला तर जगात भांडणेच होणार नाहीत

छगन भुजबळ यांच्या हस्ते रसिकलाल एम. धारिवाल हॉस्पिटलचे नाशिकमध्ये उदघाटन
Chhagan Bhujbal with Pulak sagarji Maharaj
Chhagan Bhujbal with Pulak sagarji MaharajSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जगभरात धर्माच्या (Religion) नावाखाली भांडणे आणि युद्ध सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे द्वेष (Hate) पसरत आहे. जागतिक शांतता (Peace of world) भंग होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतता आणि सत्याचा मार्ग अवलंबावा अशी शिकवण दिली. भगवान महावीरांचा (Bhagwan Mahaveer) अहिंसेचा संदेश जर जगाने स्वीकारला तर जगभरात कुठेही भांडण होणार नाही. जागतिक शांततेसाठी त्यांचे विचार अतिशय उपयुक्त आहेत असे प्रतिपादन राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

Chhagan Bhujbal with Pulak sagarji Maharaj
बारा आमदारांची नियुक्ती केवळ माझ्या नावामुळे रखडली!

शहरातील पंचवटी परिसरात महावीर जैन धर्मार्थ दवाखाना संचलित श्री.रसिकलाल एम.धारिवाल हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

Chhagan Bhujbal with Pulak sagarji Maharaj
अनिल पाटील नितीन गडकरींना भेटले अन् प्रश्न सोडवूनच परतले!

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. हुकूमचंद बागमार यांनी शहर आणि समाजासाठी मोठं योगदान दिलं. चांगलं काम करतांना अनेक अडचणी येतात. मात्र ते डगमगले नाही. सामाजिक कार्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. अतिशय चांगलं हॉस्पिटल नाशिकमध्ये उभं राहिलं आहे. रुग्णसेवेसाठी सारखी दुसरी कुठलीच सेवा नाही. मानवतेचा धर्म या ठिकाणी निभावला जाणार आहे. बॉर्डरवर लढणारा सैनिक जेवढा महत्वाचा आहे तेवढाच कोरोनात रुग्णांचा जीव वाचविणारा डॉक्टर महत्वाचा असतो.

ते म्हणाले की, देशात द्वेषाचे वातावरण निर्माण केलं जातं असून हे भक्तीच राजकारण नसून शक्तीच राजकारण आहे. लोकांना दुःख देणारे आणि अशांतता निर्माण करणारं राजकारण सद्या देशभरात सुरू आहे. शांततेचा मार्ग अवलंबिला तर त्यात सर्वांचे सुख आहे असे सांगत पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर आरोग्याच्या अनेक समस्या वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन राहण्यासाठी आपल्याला काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आचार्य श्री पुलकसागरजी महाराज, शोभाताई धारीवाल, जान्हवी धारीवाल, रमणलाल लुंकड, सोहनलाल भंडारी, सुमेरकुमार काले, सुवर्णा काले, माजी महापौर रंजना भानसी, नंदलाल पारख, डॉ. एन. पी. छाजेड, मदनलाल साखला, विलास शहा, राजेंद्र जैन, डॉ. प्रशांत छाजेड, रमेश फिरोदिया, पुनीत बालन, प्रमोद दुगड, सतीश पारख, दिपक बागड, सुजाता सराफ, बाबूभाई संचेती, निर्मलभाई गोदा, मोहनलाल चोपडा, राजमल भंडारी, विलासभाई शहा, सोनल, दगडे, मंगलचंद साखला, कांतीलाल साखला, पोपटलाल सुराणा, किसनलाल सारडा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com