बारा आमदारांची नियुक्ती केवळ माझ्या नावामुळे रखडली!

एकनाथ खडसे यांनी येत्या निवडणुकीत तळोद्यात वेगळे चित्र दिसेल असा दावा केला.
NCP leader Eknath Khadse
NCP leader Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

तळोदा : राज्यपाल (Governer) नियुक्त बारा आमदारांमध्ये माझे नाव असल्यानेच आमदारांची (MLC list) नियुक्ती रखडली आहे, त्यामुळे तो प्रश्न लवकर मार्गी लागेल असे वाटत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

NCP leader Eknath Khadse
कोर्ट `विक्रांत` सारख्या प्रश्नावर दिलासा देत असेल तर जनतेचा उद्रेक होईल!

श्री. खडसे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून, भविष्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्याचे राजकीय चित्र वेगळे राहणार आहे. भविष्यात नगरपालिका निवडणुकीसाठी राज्य स्तरावरून आघाडी करण्याचा जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य करावा.

NCP leader Eknath Khadse
चाचडगाव, वाचनसंस्कृती आणि वाचनालय...

ते म्हणाले, की मंत्रिमंडळात असलो, की जनसामान्यांचे प्रश्न अधिक प्रखरपणे सोडविण्यासाठी प्रयत्न करता येतात. मोलगी तालुक्यासाठी माझा नेहमीच आग्रह राहिला असल्याने महाविकास आघाडी सरकारकडे देखील त्या तालुक्याची मागणी कायम आहे. तळोदा नगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक तीन मधील विकासकामांच्या निधीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला असल्याने त्याचा पाठपुरावा सुरू आहे,

दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त शहरातील प्रसिद्ध रोकडमन हनुमान येथे नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी दर्शन घेतले. श्री. खडसे यांच्याहस्ते महाआरती झाली.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रीय, संदीप परदेशी, जिल्हा कोशाध्यक्ष निखील तुरखीया, तालुकाध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहराध्यक्ष योगेश मराठे, भरत चौधरी, रामराव आघाडे, नितीन पाडवी, तुषार सनसे उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com