Shrirampur Bandh : विधानसभा निवडणुकीवर श्रीरामपूरकर बहिष्कार टाकणार; कारण काय?

Transaction closed for Shrirampur district demand : श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने, तसेच सर्वपक्षीयतर्फे श्रीरामपूरमध्ये बंद पुकारला आला होता. 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला.
Shrirampur Bandh
Shrirampur BandhSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाची घोषणा येत्या 15 ऑगस्टपर्यंत न केल्यास विधानसभा निवडणुकीवर शंभर टक्के बहिष्कार घालण्याचा इशारा स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने दिला.

राजकीय ईच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळे हा प्रश्‍न गेले 40 वर्षे अडकून पडला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही मागणी मार्गी लावण्यासाठी श्रीरामपूरमध्ये बंद पुकारण्यात आला होता. या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला.

श्रीरामपूर जिल्ह्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीतर्फे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली तसेच सर्वपक्षीयतर्फे श्रीरामपूरमध्ये बंद ठेवण्यात आला. व्यावसायिकांनी देखील व्यवहार बंद ठेवत बंदमध्ये सहभाग घेतला. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, ही गेल्या 40 वर्षापासूनची सामान्यांची तीव्र ईच्छा असल्याचे या कडकडीत बंदने पुन्हा एकदा सिध्द केले. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

Shrirampur Bandh
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्याकडे दोन दिव्यांग प्रमाणपत्र; नाॅन क्रिमीलेअरची चौकशी सुरू

सुभाष त्रिभुवन यांनी 15 ऑगस्टपर्यंत श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय झाला नाही, तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. शिवसेना (Shiv Sena) उपजिल्हाप्रमुख प्रमुख सचिन बडदे यांनी श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयासाठी प्रवरेपर्यंत दिंडी काढून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले.

Shrirampur Bandh
Ajit Pawar Baramati rally : अजितदादांचे बेधडक भाषण; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर बोलले का?

श्रीरामपूर या शहराचीच शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त नाशिक यांनी राज्य सरकारकडे केली आहे. केवळ राजकीय ईच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळे हा प्रश्‍न गेले 40 वर्षे अडकून पडला आहे. त्यासाठी सातत्याने विविध अराजकीय संघटनांचे आंदोलने सुरु आहेत. आता आगामी विधानसभेच्या तोंडावर सरकारपर्यंत आवाज पोचविण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न चिघळणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com