Mallikarjun kharge VIDEO : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेचे व्यासपीठ कोसळले; दोन जण जखमी

Igatpuri Assembly Constituency Congress Rally Lucky Jadhav : त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या प्रचार सभेचे व्यासपीठ कोसळल्याने दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज थोडक्यात बचावले. त्र्यंबकेश्वर येथील प्रचारसभेचे व्यासपीठ वादळी वाऱ्यांमुळे कोसळले. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगली धावपळ उडाली. या घटनेत दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. खर्गे हे सभास्थळी पोहण्याच्या काहीवेळ आधीच ही घटना घडली. आता या घटनेची पोलिसांकडून चौकशील केली जाणार आहे.

इगतपुरी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे सभा झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या सभेला संबोधित करणार होते. खर्गे सभेला पोहोचण्याआधीच त्र्यंबकेश्वर येथे पावसाळी वातावरण तयार झाले. त्यानंतर वादळी वारे पाहू लागले. या वाऱ्याच्या वेगाने सभेचे व्यासपीठ आणि मंडप कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली.

Mallikarjun Kharge
Rahul Gandhi : सरकार महाराष्ट्राचे नाही, अदानींनी विकत घेतलंय! राहुल गांधींनी ‘त्या’ बैठकीकडे दाखवलं बोट

अचानक झालेल्या या दुर्घटनेत काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सुदैवाने अन्य कोणालाही इजा पोहोचली नाही. ही दुर्घटना झाली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष खर्गे ओझर विमानतळावर होते. तेथून ते सभेला रवाना झाले होते. व्यासपीठ कोसळल्याने यंत्रणेची एकच धावपळ उडाली. कार्यकर्त्यांनी ध्वनिक्षेपकावरून आवाहन करीत कार्यकर्त्यांना सुरक्षित ळी जाण्याचे आवाहन केले.

कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठाचे पडदे आणि अन्य व्यवस्था सुरळीत केली. त्यानंतर अर्ध्या तासाने काँग्रेस अध्यक्ष खर्गे सभेच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर नियोजनानुसार सभा झाली. इगतपुरी मतदारसंघाचे उमेदवार लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच ते वादात सापडले होते. त्यांच्या उमेदवारीच्या निषेधार्थ पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी थेट काँग्रेसचे अध्यक्ष सभा घेत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले.

Mallikarjun Kharge
Narendra Modi Vs Rahul Gandhi : लोकसभेच्या अगदी उलट होतंय विधानसभेच्या प्रचारात! कुणी घेतला कुणाचा धसका?

खर्गे यांनी उमेदवाराच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी तुमचे नाव लकी कसे अशी विचारणा केली. त्यावर जाधव यांनी माझ्या आई-वडिलांसाठी मी लकी आहे, त्यामुळे त्यांनी माझं नाव लकी ठेवले आहे, असे सांगितले. त्यावर खर्गे यांनी आता तुम्ही निवडून या आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून सुद्धा लकी व्हा, अशी फिरकी घेतली.

पोलिसांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, आज झालेल्या दुर्घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. खर्गे हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असून त्यांना विशेष सुरक्षा देखील आहे. अशा स्थितीतही सभेच्या व्यासपीठाबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली होती की नाही, याबाबत चौकशीचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com