Nashik School Case : त्याच शाळेत पुन्हा पाप, शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; यापूर्वी मुख्यध्यापकाला झाली होती जन्मठेप

Igatpuri school POCSO case : यापूर्वी ज्या शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात मुख्यध्यापकाला जन्मठेप झाली त्याच शाळेत शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केला.
Nashik School Case
Nashik School CaseAI
Published on
Updated on

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील शाळेत एका शिक्षकाने इयत्ता आठवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून घोटी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, याच शाळेत फेब्रुवारी २०२५ मध्ये घडलेल्या एका प्रकरणात सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात मुख्याध्यापकास जन्मठेप, तर सहआरोपी शिक्षकास सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. आता पुन्हा दुसरी तशीच घटना या शाळेत घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थीनी मंगळवारी (दि. २८) दुपारच्या सुमारास आपल्या भावासोबत शाळेत कागदपत्रांवर मुख्याध्यापकांची सही घेण्यासाठी गेली होती. यावेळी शिक्षक अर्जुन गभाजी हरिश्चंद्रे यांनी मुख्याध्यापक बैठकीत असून व्यस्त असल्याचे सांगत कागदपत्रांवर सही करून देतो असे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनीच्या भावाला बाहेर थांबण्यास सांगून तिला कक्षात नेले. दरम्यान, शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण करत तिच्याशी अयोग्य हावभाव करीत स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या विद्यार्थिनीने तत्काळ तेथून बाहेर पडत कागदपत्रे घेतली.

Nashik School Case
Nashik Crime News : नाशिकच्या 'गजवा ए हिंद' प्रकरणात हलगर्जी ; महिला तपास अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, पोलीस आयुक्तांचा दणका

त्यादिवशी विद्यार्थीनीचे पालक बाहेर गावी गेले होते, त्यामुळे तिने त्यांनी या घटनेची माहिती दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी पालक घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे पाहून त्यांनी तिची विचारपूस केली. तेव्हा मुलीने पालकांना सगळं काही सांगितलं. यानंतर संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विद्यार्थिनीने घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Nashik School Case
Nashik Crime News : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपींचा पाय खोलात, ॲट्रॉसिटी’चे कलम वाढले...

तालुक्यातील अडसरे येथेही शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना यापूर्वी घडली होती. वारंवार अशा घटना घडत असूनही शिक्षण विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पालकांकडू संताप व्यक्त केला जात असून शिक्षणव्यवस्था झोपलेली आहे का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. तसेच शिक्षकांवर प्रशासनाचा वचक नसल्याने अशा घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com