Satyajit Tambe : मी वादळ शांत होण्याची वाट पाहतोय; सत्यजीत तांबेंचे महत्वाचे विधान

Satyajit Tambe News : ''आपण आपली भूमिका येत्या 19 किंवा 20 तारखेला स्पष्ट करणार''
Satyajit Tambe
Satyajit Tambe Sarkarnama

Satyajit Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. तर डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी काँग्रेस (Congress) पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

असे असतानाच आता सत्यजीत तांबे आणि एका व्यक्तीची ऑडिओ संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

''मी वादळ शांत व्हायची वाट पाहतोय'', असं त्या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये सत्यजीत तांबे हे मतदाराला म्हणत आहेत. तसेच आपण आपली भूमिका येत्या 19 किंवा 20 तारखेला स्पष्ट करणार असल्याचे देखील ते या क्लिपमध्ये बोलत आहेत.

Satyajit Tambe
Sudhir Tambe : निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मात्र, या व्हायरल क्लिपबाबत तांबे यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तर सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे ते नेमकी कोणत्या पक्षात आहेत? याविषयी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्यामुळे आपण भूमिका स्पष्ट करावी, असे मत ती व्यक्ती या क्लिपमध्ये मांडत आहे.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामधील व्यक्ती हा जळगाव (Jalgaon) येथील असल्याचे सांगत आहे. तसेच आता सत्यजीत तांबे येत्या दोन दिवसात नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satyajit Tambe
Congress : मोठी बातमी! काँग्रेसमधून सुधीर तांबे यांचे निलंबन

काय आहे व्हायरल संभाषण?

मतदार : दादा नमस्कार

सत्यजीत तांबे : नमस्ते, बोला

मतदार : दादा, दोन दिवसांपासून टीव्हीवर पाहतोय. त्यामुळे परेशान होतो. मागच्या वेळेस बाबांना मतदान केलं होतं. मात्र, आता तुम्ही फॉर्म भरलाय, त्यामुळे थोडा इरिटेड झालो होतो. आम्ही तुमचेच मतदार आहोत. मी तुमचे मामा थोरातानांही ओळखतो. मी जळगाव येथून...बोलत आहे. पक्ष आम्हाला काही माहित नाही. शेवटी जो पदवीधरांसाठी लढतो. त्याच्यामागे पदवीधर असतात. पण सध्या लोकांना प्रश्न पडलाय की जायचं कुठे?

सत्यजीत तांबे : आपले संबंध पारिवारिक आहेत. एकत्रच राहायचं. प्रश्नच येत नाही काही.

मतदार : नेमकं तुम्ही कुठे आहेत हे लोकांना सांगायला हवं.

सत्यजीत तांबे : मी अपक्ष आहे मी काँग्रेसचाच फॉर्म भरला होता. मात्र, एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून फक्त अपक्ष फॉर्म भरला.

मतदार : तुमचे एक वेगळे स्थान आहे. ज्याला पक्ष नाही. अलीकडेच तुमचे युट्यूबवर फॉलोअर्स वाढले आहेत. तुमच्या फॉलोअर्सला पक्षच नाही.

सत्यजीत तांबे : हा पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करायचे आहे. मला कुठल्याही राजकारणात अडकायचं नाही मी ठरवलंय.

मतदार : दादा तुमच्यासोबत आमच्या शुभेच्छा आहेत. पण तुमची भूमिका जाहीर होत नाही त्यामुळे संभ्रम आहे.

सत्यजीत तांबे : लवकर भूमिका स्पष्ट करु. थोडं हे वादळ शांत होऊद्या. मी वादळ शांत होण्याची वाट पाहतोय. वादळात वादळ म्हणलं की गोंधळ होतो. त्यामुळे हे सगळं शांत होऊ देऊ मग बोलू आपण. दोन दिवसांनी. 19 किंवा 20 तारखेला सगळी भूमिका सांगू..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com