Congress : मोठी बातमी! काँग्रेसमधून सुधीर तांबे यांचे निलंबन

Dr. Sudhir Tambe : सुधीर तांबेंची काँग्रेसकडून चौकशी होणार, हायकमांडचे आदेश
Dr. Sudhir Tambe
Dr. Sudhir Tambe Sarkarnama
Published on
Updated on

Congress : डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसकडून शिस्तभगांची कारवाई करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. सुधीर तांबेंची चौकशी होईपर्यंत त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे.

Congress Letter
Congress Letter

डॉ. सुधीर तांबे यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या या चौकशीचे आदेश काँग्रेस (Congress) हायकमांडकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Dr. Sudhir Tambe
मुंबईत ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचा मोठा डाव? चहल यांना ईडीची नोटीस अन् पेडणेकरांवर...

सुधीर तांबे यांची नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

Dr. Sudhir Tambe
BJP Politics भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रदेशाध्यक्षांबाबत पक्षात नाराजीचा सुर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीतील काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडने सुधीर तांबे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता सुधीर तांबे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com