Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेबाबत ज्ञानेश्वर म्हात्रेंनंतर सत्यजीत तांबेंचेही महत्त्वाचे विधान; म्हणाले...

Satyajit Tambe, Dnyaneshwar Mhatre News : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला.
Satyajit Tambe, Dnyaneshwar Mhatre News
Satyajit Tambe, Dnyaneshwar Mhatre NewsSarkarnama
Published on
Updated on

Old Pension Scheme News : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा चांगलाच गाजला. पेन्शन योजनेला पाठिंबा देणाऱ्या उमेदवारालाच मतदान करणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत अनेक उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता.

ज्या उमेदवारांच्या जाहिरनाम्यानत जुन्या पेन्शनचा विषय होता, त्यांना कर्मचाऱ्यांनी भरभरून मते दिली. या निवडणुकीत भाजपला (BJP) चांगलाच फटका बसला. विजयी उमेदवारांनी आता पेन्शनबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. सत्यजीत तांबे यांनीही याबाबत आज (ता.४) भाष्य केले.

Satyajit Tambe, Dnyaneshwar Mhatre News
Chinchwad by-election : ''जगताप कुटुंबात वाद ही विरोधकांनी उठवलेली वावटळ, शंकर जगताप हे मला मुलासारखे''

सत्यजीत तांबे यांनी आज आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. मी अपक्ष निवडून आलो आहे. त्यामुळे मी अपक्षच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसचे जुन्या पेन्शन योजनेसाठी लढणार आहे. सरकारला ही योजना पुन्हा सुरु करण्यासाठी भाजप पाडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी सभागृहात आवाज उठवार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

दरम्यान, भाजपचे नेते व कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडून येतातच आपल्या कार्यकाळात शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे पेन्शन धारकांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व आमदारांनी पेन्शनचा मुद्दा सभागृहात उचलून धरला तर त्यामध्ये सरकारला काही भूमिका घ्यावी लागेल, असे कर्मचारी म्हणतात.

Satyajit Tambe, Dnyaneshwar Mhatre News
Maharashtra : जुनी पेंशन इतकाच सेवानिवृत्तीचाही मुद्दा महत्वाचा, आमदारांनी सभागृहात मांडावा…

या निवणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) औरंगाबाचे आमदार विक्रम झाले यांनीही प्रचारामध्ये सुरुवातीपासून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा लावून धरला होता. त्याच मुद्यावर त्यांनी शिक्षकांकडे मते मागितली होती. तर काँग्रेसचे (Congress) नागपूरचे आमदार सुधाकर अडबाले यांनीही पेन्शनच्या मुद्याचे समर्थन केले होते. तसे अमरावती पदवीधरचे आमदार धीरज लिंगाडे यांनीही कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे या निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना ताकद दाखवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com