Ashwini Jagtap News
Ashwini Jagtap NewsSarkarnama

Chinchwad by-election : ''जगताप कुटुंबात वाद ही विरोधकांनी उठवलेली वावटळ, शंकर जगताप हे मला मुलासारखे''

Ashwini Jagtap News : अश्विनी जगताप यांची उमेदवारी सकाळी जाहीर होताच दुपारी त्या प्रथमच मिडियाला सामोरे गेल्या.
Published on

Chinchwad by-election News : चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे तेथे लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निश्चीत होण्यास मोठा वेळ लागला. त्यातून जगताप कुटंबात वाद असल्याने तो जाहीर करण्यास विलंब झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ती फक्त अफवा असल्याचे खुद्द स्व. आ. जगतापांच्या पत्नी आणि चिंचवडच्या भाजप (BJP) उमेदवार अश्विनी जगताप यांनी आज स्पष्ट केले.

अश्विनी जगताप यांची उमेदवारी सकाळी जाहीर होताच दुपारी त्या प्रथमच मिडियाला सामोरे गेल्या. तत्पूर्वी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्यांची पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर बोलताना जगताप कुटुंबात वाद आहे ही विरोधकांनी उठवलेली वावटळ (अफवा) असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashwini Jagtap News
Kasba by-election : कसब्यात हेमंत रासनेंना उमेदवारी; ब्राम्हण समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसणार का?

तसेच माझे दीर शंकरशेठ जगताप हे मला मुलासारखे आहेत, असे त्या म्हणाल्या. अशा वावटळी न उठविण्याची हात जोडून विनंती त्यांनी विरोधकांना यावेळी केली. गेली तीस वर्षे आमचे कुटुंब एक असून पुढेही एकत्रच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेली तीस वर्षे साहेब फ्रंटला, तर मी त्यांच्यापाठी होते

साहेबांच्या (स्व. आ. जगताप) विचाराचा वारसा पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. तसेच पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) मेट्रो सिटी बनविण्याचे त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्नही साकार करण्यासाठी अशीच झटणार आहे, असे अश्विनी जगताप यांनी उमेदवारी सांगितले. पक्षाचा अजेंडा पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ashwini Jagtap News
Ashwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या उमेदवारीमुळं भाजपमध्ये हुरूप; तर राष्ट्रवादीचं वाढलं टेन्शन

गेली तीस वर्षे मी फ्रंटला नसले, तरी पडद्यामागून त्यांच्या (आ. जगताप) पाठी मी काम करीत होते. पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, रहाटणी हा भाग मी पिंजून काढला होता. त्यामुळे मला चांगला अनुभव आहे. कार्यकर्ते व नगरसेवक बरोबर असल्याने कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जायचे याचा अनुभव आहे, असे सांगत त्यांनी निवडणूक तयारीचे रणशिंग फुंकले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com