Imran Pratapgarhi News : मोदींबाबतचा 'तो' दावा काँग्रेस खासदाराने खोडून काढला ; मणिपूरवर बोलायचे नाही, म्हणून मोदींनी सुट्टी घेतली...

PM Modi News : लाठी चालवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ?
PM Modi , Imran Pratapgarhi
PM Modi , Imran Pratapgarhi Sarkarnama

Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून नऊ वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असे माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) मागितलेल्या माहितीच्या उत्तरात केंद्र सरकारकडून हे सांगण्यात आले आहे. 'मोदी सतत ड्युटीवर असतात,' अशीही माहिती समोर आली आहे. "मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, त्यांच्या सुट्टीची परिभाषा काय? असा प्रश्न खासदार इम्रान प्रतापगढी यांनी उपस्थित केला आहे.

"मणिपूर हिसेंवर बोलायचं नाही, म्हणून त्यांनी सुट्टी घेतली, कर्नाटक राज्यात प्रचारासाठी त्यांनी सुट्टी घेतली," असे सांगत मोदींनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही, हा दावा प्रतापगढी यांनी खोडून काढला आहे. नाशिक येथील कार्यक्रमात ते बोलत होते. इम्रान प्रतापगढी यांनी खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी नाशिक मधील डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलला देण्याचे जाहीर केले.

PM Modi , Imran Pratapgarhi
Bachchu Kadu News : बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; बदनाम झालो पण...; शिंदे-फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला..

हे लुटेऱ्या लोकांचे सरकार आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत होते. तेव्हा सातशे शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर सरकारच्या काळजाला पाझर फुटला आणि कायदे मागे घेतले. लाठी चालवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? असा प्रश्न इम्रान प्रतापगढी यांनी उपस्थित केला आहे.

PM Modi , Imran Pratapgarhi
Bharat Vs INDIA Row : 'भारत' जोडो' नावाने यात्रा काढता, मग त्या नावाने काळीज का धडधडतंय ? भाजपच्या वाघांनी काँग्रेसला डिवचलं

"जे दोन हजार रुपयांची नोट चालवू शकले नाही, ते देश काय चालवणार? सरकार विरोधात काही बोललं की, पोलीस दारात येऊन उभे राहतात," असे प्रतापगढी म्हणाले. "आम्ही जर आमच्या आघाडीचे नाव बदलून 'भारत'केले, तर तुम्ही काय करणार?' असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला.

मोदींच्या सुट्टीबाबत पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी पीएमओमध्ये आरटीआय दाखल करून ही माहिती मागवली होती.पीएमओचे अवर सचिव परवेश कुमार यांनी आरटीआयला उत्तर दिले आहे. ते संबंधित मंत्रालयाचे मुख्य पिंक माहिती अधिकारी (CPIO) आहेत जे RTI प्रश्नांना उत्तरे देतात. याचे उत्तर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी X वर शेअर केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये #MyPmMyPride लिहिले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com