Bachchu Kadu News : बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; बदनाम झालो पण...; शिंदे-फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला..

Maharashtra Politics : हा बच्चू कडू तुमचा आयुष्यभर गुलाम राहिल असे बोललो, परंतु त्यांनी ते दिले नाही,"
Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिंदे गटातील आक्रमक नेते म्हणून ओळख असलेल्या बच्चू कडूंनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 'दिव्यांग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी' या कार्यक्रमाचे धुळ्यात आयोजन करण्यात आले होते. बच्चू कडूंनी तुफान फटकेबाजी करीत राज्यातील सत्तातर, गुवाहाटी दौऱ्याच्या आठवणी सांगितल्या.

बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दिव्यांग मंत्राल्यावरून निशाणा साधला. "अडीच वर्ष मी मंत्री असताना मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली. जर तुम्ही दिव्यांग मंत्रालय दिले तर हा बच्चू कडू तुमचा आयुष्यभर गुलाम राहिल असे बोललो, परंतु त्यांनी ते दिले नाही," असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Bharat Vs INDIA Row : 'भारत' जोडो' नावाने यात्रा काढता, मग त्या नावाने काळीज का धडधडतंय ? भाजपच्या वाघांनी काँग्रेसला डिवचलं

"गुवाहाटी जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला. मी त्यांनी म्हणालो होतो, मी येतो पण दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे , ते त्यांनी मान्य केले," असे सांगत बच्चू कडूंनी ठाकरेंनी आपली अडीच वर्ष निराशा केल्याचे सांगितले.

"विधानसभेत मी प्रामाणिकपणे काम करतो, दिव्यांगाशिवाय काहीही बोलत नाही. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय आपल्या राज्यात झाले," असे बच्चू कडू म्हणाले. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ या यावेळी देण्यात आला.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com