Bhausaheb Wakchaure News : खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची झाडाझडती घेतली. तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत तालुक्यातील अवैध धंद्यांचा पाढाच वाचला.
दारू, मटका, जुगार, ऑनलाइन जुगार, कुत्ता गोलीची तालुक्यात सर्रास विक्री सुरू असून, अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी केली.
कोपरगाव तालुक्यातील अवैध धंद्यांविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महसूल प्रशासनाची झाडाझडती घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी होते. शेवगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविषयी तक्रारींचा पाढाच मांडला. शिवसेना पदाधिकारी अवैध धंद्यांवरून पोलिस प्रशासनाविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते.
शिवसेनेचे (Shiv Sena) उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव यांनी कोपरगावमधील शहरात मटका, जुगार आणि अवैध धंद्यांची ठिकाणांसह माहिती बैठकीत मांडली. या अवैध धंद्यांमुळे बेरोजगार युवक, तरुण उद्धवस्त होत आहे. मटका थेट तहसील कार्यालयाच्या दारापर्यंत पोचला आहे. त्यामुळे शहरात अवैध धंदे रोखा. तसेच शहरातील कन्या शाळेसमोर पडकी इमारत, उर्दू शाळेसमोरील झोपडी ही गरदुल्यांचा अड्डा बनल्याची तक्रार कैलास जाधव यांनी केली.
अवैध धंदे बंद असल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून होत असला, तरी शहरात छुप्यापद्धतीने धंद्यांचा जोर वाढला आहे. नशेबाज कोपरगाव होण्यापासून वाचवण्याची मागणी, सनी वाघ यांनी केली. कोपरगाव शहरात नशेबाजांकडून भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांनी नशेबाज वाहन चालकांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घ्यावी. कोपरगाव शहरात विकसित होत असलेल्या बाजारतळावर युवकांचे नशा करण्याचे अड्डे तयार झाले आहे. या भागात पोलिस गस्त वाढवून नशेचे साहित्य पुरवणाऱ्यांविरोधात वेगाने कारवाई करा. नशा साहित्य पुरवठा करणारे साखळी उद्धवस्त करण्यात पोलिसांना बोटचेपी भूमिका घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन होईल. ते आंदोलन महसूल आणि पोलिस प्रशासनाला परवडणार नाही, असा इशारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिला.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली. पोलिस आणि महसूल प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या. नशेचे साहित्य पुरवठादारांविरोधात वेगाने कारवाई करा. कोपरगावामधील अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिस आणि महसूल प्रशासनाने बेधडक कारवाई करावी. यासाठी काही प्रशासकीय मदत वाढवायची असल्यास सांगावी. सर्व राजकीय सहकार्य करू. पण अवैध धंद्यांना आळा घालावा. स्थानिक पोलिसांनी अवैध धंद्याबाबत कारवाईची मोहीम न राबवल्यास पोलिस अधीक्षकांना भेट घेऊन लक्ष वेधू, असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.