जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमच्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीला यश मिळाले आहे, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका आम्ही तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून लढणार आहोत, असे शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. (In Jalgaon, NCP-Shiv Sena-Congress will contest ZP and municipal elections together: Gulabrao Patil)
पालकमंत्री पाटील हे जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा बॅंकेतील यशाचा दाखल देत आगामी निवडणुकाही महाआघाडी करून लढण्याचा विचार बोलून दाखविला आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. यात महाविकास आघाडीने २१ पैकी २० जागा जिंकून मोठे यश मिळविले आहे. जिल्हा बँकेच्य अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यशामुळे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील, अशी चर्चा सुरू आहे.
शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना याबाबत विचारला असता, ते म्हणाले की, जळगाव जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षाने एकत्रीत यश मिळवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे. पुढच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. पण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात लागणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत. जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीमुळे आमचे बळ वाढलेले आहे, त्यामुळे येत्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळविणार आहे, असे चित्र या जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
आम्ही तिघे एकत्र येणारच
तुम्ही तीन पक्ष या निवडणुकीत एकत्र येऊ शकणार काय? या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्यात तीन पक्षाचे सरकार येईल, असे कुणाला वाटत होते का? परंतु तीन पक्षाचे सरकार आलेच ना! जिल्हा बँक निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आलेच ना. मग जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आम्ही नक्की एकत्र येवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.