Nashik Loksabha Election : 'नाशिककर, व्होट कर', पण...बचत गटांकडून कोणाला कर?

Nashik Election voting : नाशिक जिल्ह्यात महिला गटांनी मतदान करण्यासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नांचे फळ कोणाला?
Voting
VotingSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान 20 मे रोजी झाले. यामध्ये महिला बचत गटांच्या सदस्यांनी मतदान करावे यासाठी ग्रामविकास विभागाने मेहनत घेतली. या महिलांनी कोणाला मतदान करावे यासाठी काही अप्रत्यक्ष यंत्रणा तर कार्यरत नव्हत्या ना याची चर्चा सुरू आहे.

निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश होते. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये "नाशिककर, व्होट कर" अशी मोहीम राबवून मतदान जागृती करण्यात आली होती. त्याचा किती उपयोग झाला, हे अद्याप पुढे आलेले नाही. मात्र यानिमित्ताने सध्या एक वेगळीच चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये जोरात आहे.(Nashik Election voting)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Voting
Nilesh Lanke V/S Sujay Vikhe : धनशक्ती की, जनशक्ती, विखे की, लंके; विजयाचा गुलाल कोणाचा? चर्चांना उधाण...

जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हाभरातील महिला बचत गटांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या संदर्भात बचत गटांच्या प्रमुखांना सातत्याने सूचना आणि निर्देश देण्यात येत होते. जास्तीत जास्त मतदान व्हावे, म्हणून राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील तसे प्रयत्न केले. यामध्ये जिल्हाभरात 28 हजार 234 बचतगट आहेत.

या बचत गटांमध्ये प्रत्येकी सरासरी 10 ते 12 महिला सदस्या आहेत. त्यांची संख्या दोन लाख 82 हजार 340 आहे. यातील दोन लाख 54 हजार 651अर्थात जवळपास 92टक्के महिलांनी विशेष तयारी करून मतदान केंद्रांवर मतदान केले. विशिष्ट मतदारांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याचे आजवर निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जनजागृती करण्यात आली. गृहभेटी देऊन महिलांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचा अतिशय सविस्तर डेटा उपलब्ध करण्यात आला होता. महिला बचत गटांनी विशेष तयारी करून सकाळी अकराच्या आधी मतदान करावे, अशा देखील सूचना होत्या.

बचत गटाच्या ग्रामसंघ, प्रभात संघ, गावनिहाय प्रेरिका, बँक सखी, कृषी सखी, पशु सखी यांच्यात समन्वय निर्माण करण्यात आला. त्यासाठी त्यांना कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात याचे कोड वर्ड देण्यात आले होते. त्याची मतदानाच्या विभागाकडे ही नोंद झाली. या निमित्ताने शासनाचे धोरण म्हणून ते यशस्वी झाले.

Voting
Girish Mahajan news: गिरीश महाजनांनी वाढवली भाजप आमदारांची धडधड!

हे मतदान आटोपल्यानंतर आता त्याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे. शासनाच्या यंत्रणेचा हा डेटा एका राजकीय पक्षाकडे देखील उपलब्ध होता. त्यांनी या महिलांची संपर्क करून त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी खास प्रयत्न केले. या राजकीय पक्षाने त्याचे नियोजन खूप आधीपासून केले होते. प्रत्यक्ष निवडणुकीत त्याची कार्यवाही राज्य शासनाच्या ग्रामविकास यंत्रणेने केली.

या दोन लाख 54 हजार महिला मतदारांनी नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदार संघाच्या मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण या विधानसभा मतदारसंघात मतदान केले. एका लोकसभा मतदारसंघात सुमारे 80 ते 90 हजार महिलांनी हे मतदान केले. त्याचा लाभ कोणत्या राजकीय पक्षाला होतो आणि कोणत्या उमेदवाराला फायदा होतो, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होऊ शकेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com