Nagar Election News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या मुद्याला घातलेली साद तर, शरद पवारांनी मते खेचण्यासाठी वापरलेला जुना अनुभव, यामुळे नगर दक्षिणची लोकसभा (Nagar South Lok Sabha) मतदारसंघाची निवडणूक रंगतदार झाली. परंतु विजय कोणाच्या पथ्यावर पडतो, याचीच उत्कंठा शिगेली पोहोचली आहे. विजय कोणाचा धनशक्ती की, जनशक्ती?, अशी चर्चा रंगली आहे.
भाजप (BJP) उमेदवार खासदार सुजय विखे यांनी प्रभू श्रीराम लल्ला प्राण प्रतिष्ठापणा निमित्ताने साखर-डाळ घेऊन उमेदवार निश्चित होण्याआधीच आपल्या निवडणुकीची दिशा पक्की केली होती. साखर-डाळ वाटताना विखेंनी त्यांची प्रख्यात 'विखे यंत्रणा' वापरली. नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम मार्गी लावल्यानंतर खासदार सुजय विखेंच्या (MP Sujay Vikhe) काम करण्याची पद्धती नगरकरांना भावली. विकास कामांच्या मुद्यावर आपण निवडणुकीला समोरे जाणार, अशीच त्यांनी भूमिका घेतली. खासदार विखेंची ही भूमिका मतदान घेण्यास कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हजेरी लावली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभा झाल्या. पक्ष निरीक्षकांची हजेरी वेगळीच होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची नगर शहरात सभा झाली. पंतप्रधानांनी या सभेत शरद पवारांविरोधात एक शब्द उच्चारला नाही. मात्र मुस्लिमांविषयी भीती घातली. यातच मुस्लिम समाजाचे मतदान वाढले, पण ते मतदान कोणाकडे गेले, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
यातच खासदार विखेंना भाजप अंतर्गत नाराजीचा मोठा सामना करावा लागला. 'विखे यंत्रणे'मुळे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते काहीसे नाराज आणि दूर दिसले. मतदान केंद्राबाहेर देखील भाजप निष्ठावनांची गर्दी कमी होती. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र खासदार विखेंच्या बाजूने ताकद उभी केली होती. तशी ती दिसत देखील होती. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी पारनेरमध्ये लावलेला जोर चर्चेचा ठरला. खासदार विखेंचा प्रतिस्पर्धी उमेदवार पारनेरमधीलच होता. त्यामुळे विखे पिता-पुत्रांनी तिथे वाढवलेला जोर कितपत यशस्वी ठरतो, हे मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांची युवकांमध्ये क्रेज आहे. त्यांनी अजितदादांची साथ सोडून देत शरद पवार गटात आले. आमदारकीचा राजीनामा देत थेट खासदारकीच्या मैदानात उतरले. खासदार सुजय विखेंनी सुरूवातीला त्यांच्यावर लोकसभेतील कामासाठी इंग्रजीवरून घेरण्याचा प्रयत्न केला. खासदार विखेंवर भाषेचा बाण उलटला. यानंतर नीलेश लंके यांचा काॅन्फिटंड एवढा वाढला की, त्यांनी धनशक्तीविरोधात जनशक्ती, असा प्रचार रंगवला.
नीलेश लंकेंनी पहिल्यापासून याच प्रचारावर भर दिला. शरद पवार यांनी नीलेश लंकेंसाठी आपला सर्व जुना अनुभव पणाला लावला. मतदारसंघात पाच सभा घेतल्या. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, शिवसेनेचे विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, काँग्रेसचे जयंत वाघ, किरण काळे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते नीलेश लंके यांच्यासाठी एकसंघ दिसले. त्यामुळे यांची मेहनत सार्थकी लागणार का, याची उत्सुकता आहे. Sujay Vikhe or Nilesh Lanke will win in Nagar South Lok Sabha
खासदार सुजय विखे यांना गेल्या 2019 च्या निवडणुकीत सर्व विधानसभा मतदारसंघात मताधिक्य होते. यावेळी मात्र अटीतटीची निवडणूक झाली. वंचितने देखील एन्ट्री घेतल्याने मतविभाजन होणार आणि त्याचा फटका कोणाला बसणार, याची चर्चा रंगली आहे. नगर दक्षिण मतदारसंघात मराठा, माळी, मुस्लिम, दलित मतं निर्णायक ठरतात. या मतांची विभागणी कशा पद्धतीने झाली, याचे आडाखे अजूनही बांधली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.