Nilesh Lanke News: अजितदादांच्या लाडक्या नीलेश लंकेंची शरद पवारांच्या बैठकीत हवा

Sharad Pawar VS Ajit Pawar: शरद पवार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके यांचे नाव चर्चेत आले.
Sharad Pawar, Ajit Pawar, Nilesh Lanke
Sharad Pawar, Ajit Pawar, Nilesh Lanke Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेले दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याची गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. शरद पवार नगर दक्षिण मतदारसंघाचा आढावा घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके यांचे नाव चर्चेत आले.

यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान करत त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपवली. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार काय निर्णय घेतात, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यात 15 लोकसभा मतदारसंघांत चाचपणी सुरू आहे. यात नगर दक्षिणचादेखील समावेश आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. नगर दक्षिणचा आज मुंबईत आढावा घेण्यात आला. तिथे भाजपविरोधात कोणता उमेदवार असेल, यावर बराच खल सुरू होता. तेवढ्यात राष्ट्रवादीचे पारनेर तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे यांनी आमदार नालेश लंके यांचे नाव सुचविले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar, Ajit Pawar, Nilesh Lanke
Ahmednagar BJP: भाजपची नगर शहर कार्यकारिणी जाहीर; विखे गटाला झुकते माप

आमदार नीलेश लंके यांचा आजही शरद पवार यांच्याबरोबर असल्याचा दावा बाबाजी तरटे यांनी केला. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात आमदार लंके हेच योग्य उमेदवार राहतील, असे त्यांनी सांगितले. आमदार लंके शरद पवार यांच्याबरोबर राहतील, याची जबाबदारी कार्यकर्ते म्हणून आम्ही घेतो, असेही बाबाजी तरटे म्हणाले.

यावर शरद पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बाबाजी तरटे यांना दोन दिवसांपूवी अजित पवार यांच्या दौऱ्यात तुम्ही कोठे होता, असे विचारले. त्यावर तरटे यांनी कार्यक्रमाच्या आजूबाजूलाच होतो.

कार्यक्रमस्थळी आमदार नीलेश लंके यांनी लावलेल्या फलकावर शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचेदेखील छायाचित्र होते, असेही बाबाजी तरटे यांनी सांगितले. याची दखल जयंत पाटील यांनी घेत बैठकीच्या समारोप भाषणात त्यांनी आमदार लंकेंबाबत सूचक संकेत केले.

Sharad Pawar, Ajit Pawar, Nilesh Lanke
Ahmednagar Politics: नगर भाजपतील वाद चव्हाट्यावर; विखेंसमोरच राम शिंदेंची खदखद

"आमदार लंकेंच्या नावाचा विचार केला जाईल. परंतु दसऱ्याच्या आत किंवा बाहेर, अशा आठ दिवसांत निर्णय झाला पाहिजे. त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, आठ दिवसांनंतर उमेदवार निश्चित होऊन संबंधिताला काम करण्याच्या सूचना दिल्या जातील", असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, नगर दक्षिण लोकसभा आढावा बैठकीला आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, अभिषेक कळमकर यांच्यासह आदी उपस्थित होते, तर पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदी उपस्थित होते.

या वेळी भाजपकडून खासदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा संधी मिळणार असल्याने, त्यांना टक्कर देऊ शकणाराच उमेदवार द्यावा, अशी सुरुवातीला मागणी करण्यात आली. यात आमदार रोहित पवार यांचे नाव सुरुवातीला घेण्यात आले. त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अनिल आठरे यांच्या नावाचीही चर्चा झाली.

रोहित पवार अनुपस्थित...

लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीला आमदार रोहित पवार अनुपस्थित होते. पुण्यात विश्वचषकातील भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना आज होत असल्याने आमदार रोहित पवार तिथे उपस्थित राहिले होते. त्यामुळे आमदार रोहित पवार बैठकीला येऊ शकले नसल्याचे कारण देण्यात आले.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar, Ajit Pawar, Nilesh Lanke
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com