NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
Sharad Pawar, Jayant Patil, Ajit Pawar
Sharad Pawar, Jayant Patil, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवारांनी जुलैमध्ये बंड करत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांनाच आव्हान दिलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले, यानंतर दोन गटातील संघर्ष थेट निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहाेचला. असे असतानाच आता जयंत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवारांचे टेन्शन वाढले आहे.

Sharad Pawar, Jayant Patil, Ajit Pawar
MP Amol Kolhe News : शिरूरला डॉ. कोल्हेंची जादू पुन्हा दिसणार का, सलग दुसऱ्यांदा खासदार होणार ?

"अजित पवार गटातील 15 आमदार आमच्या संपर्कात असून, अनेक जणांना परत पक्षात यायचे आहे. याबाबत विचारही सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय शरद पवारच घेतील", असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

"खोलात जाऊन त्यांना अडचणीत आणणं आपल्याला योग्य वाटत नाही. त्यांची अडचण होऊ नये, त्यांची कामे होणे गरजेजे आहे. त्यामुळे योग्यवेळी काय ते जाहीर करू. मात्र, आमदारांना पुन्हा पक्षात घ्यायचे की नाही याबाबतचा अंतिम निर्णय शरद पवारच घेतील", असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची आढावा बैठक पार पडली. या वेळी विविध मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या वेळी आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही जयंत पाटील यांनी भाष्य केले.

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवणार असून, अनेक पक्ष महाविकास आघाडीत येऊ इच्छित आहेत, तर लोकसभा जागावाटपाचा निर्णय चर्चा करून घेऊ, असेही पाटील यांनी सांगितले.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar, Jayant Patil, Ajit Pawar
Vijay Wadettiwar - CM Shinde Meeting : सर्वात मोठी बातमी ! विरोधी पक्षनेते वडेट्टीवार तडकाफडकी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com