Rohit Pawar News : उन्हामुळे पवारांच्या सभेत गोंधळ; रोहित पवार थेट लोकांमध्ये

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जळगावमध्ये सभा झाली.
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama

Jalgaon News : शहरात आज (ता. ५) उन्हाचे तापमान जास्त होते, शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा सुरू असतानाही सभा मंडपाच्या डी झोन मध्ये ऊन आले होते. त्यावेळी नागरिक सावलीसाठी पुढे सरकत होते, त्यावेळी एकच गोंधळ उडाला. मात्र, हा गोंधळ शांत करण्यासाठी आमदार रोहित पवार व्यासपीठावरून उतरून थेट उन्हात जनतेत जावून बसले अन् गोंधळ शांत झाला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे, या ठिकाणी दररोज उन्हाचे तापमान वाढत आहे. जनता मात्र, दरारोज पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. पाऊस येईल या अपेक्षेने सभेच्या ठिकाणी व्यासपीठ तसेच जनतेसाठी वॉटरप्रूफ तंबू उभारण्यात आला होता.

Rohit Pawar News
Ambadas Danve On Ajit Pawar : गृहमंत्र्याला पोलीस कवडीची किंमत देत नाही, असं अजित पवारांना म्हणायचंय का ?

मात्र, व्यासपीठ आणि जनतेसाठी बसण्याच्या तंबूत मधली डि झोनची जागा मोकळीच होती. त्या ठिकाणी कोणतेही वरच्या भागात आच्छादन नव्हते. दुपारी दोन वाजता सभा होती, सभा सुरू झाल्यानंतर उन वाढत गेले साडेतीन वाजता अधिकच उन वाढले तसेच नागरिकांची गर्दीही वाढली होती. त्यावेळी काही नागरिक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डी झोनमध्ये असलेली सावली शोधत त्या ठिकाणी जागा मिळविण्याचा प्रयत्न करू लागले त्यावेळी पोलीसांनी विरोध केला.

Rohit Pawar News
Jayant Patil Taunts Walse Patil : जयंत पाटलांचा वळसेंना जोरदार टोला; ‘जिस स्कूलमें आप अभी अभी दाखिल हुए है, उस स्कूल के प्रिन्सिपलभी...’

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोलीसांना जागा देण्यास सांगितले, त्यावेळी एकच गोंधळ उडाला त्याचवेळी रोहित पवार व्यासपीठावरून खाली आले, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर मुंडासे बांधून ते जनतेत बसले. त्यानंतर नागरिकही शांत झाले अन् सभा शांततेत झाली. सभा संपेपर्यंत ते जनतेतच बसून होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com