Ambadas Danve On Ajit Pawar : गृहमंत्र्याला पोलीस कवडीची किंमत देत नाही, असं अजित पवारांना म्हणायचंय का ?

Shivsena UBT News : तुम्ही राज्यकर्ते शासन करण्यास लायक नाही, तर नालायक आहात!
Ambadas Danve News
Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad Political News : अंतरवाली सराटी येथे पोलीसांनी आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला, गोळीबार मुंबईतून कुणाच्या आदेशाने झाला? असा सवाल विचारला जातोय. (Ambadas Danve News) यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृह तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया व्यक्त केली.

Ambadas Danve News
Girish Mahajan On Maratha Protest : निर्णयासाठी सरकार एक महिन्याचा वेळ मागणार ; महाजन अंतरवालीत..

अजित पवार यांनी थेट यावर भाष्य करत विरोधकांना आव्हानच दिले. (Maharashtra) आमच्या तिघापैकी कोणी लाठीचार्जचे आदेश दिले हे सिद्ध करावे. सिद्ध झाले तर आम्ही राजकाणातून बाजूला होऊ, असे ते म्हणाले. (Shivsena) त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्या या विधानावर प्रश्न उपस्थितीत करत गृहमंत्र्याला पोलीस कवडीची किंमत देत नाही, असं अजित पवारांना (Ajit Pawar) म्हणायचंय का? असा टोला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.

दानवे म्हणाले, म्हणजे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला पोलीस कवडीची किंमत देत नाही! असं म्हणायचं आहे का अजीत पवारांना? थोडक्यात काय तर हे सरकार थापाडे, फडतुस, नपुसंक सरकार आहे.

आणि राहिला प्रश्न लाठीचार्जचा तर आंदोलन‌ स्थळाची, निवृत न्यायाधीशांमार्फत चौकशी करत सीडीआर सार्वजनिक करा, दुध का दुध पाणी का पाणी. तुम्ही राज्यकर्ते शासन करण्यास लायक नाही, तर नालायक आहात!, अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com